'आता मी सासऱ्यांच्या टीममधून शर्माजींच्या मुलाला...' KL राहुल असं का म्हणाला?

Pranali Kodre

आयपीएल 2024 स्पर्धेत 67 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला लखनौ सुपर जायंट्सने 18 धावांनी विजय मिळवला.

LSG | X/LucknowIPL

हा सामना मुंबई आणि लखनौ दोन्ही संघांचा आयपीएल 2024 हंगामातील अखेरचा सामना ठरला. कारण या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले आहे.

Lucknow Super Giants | Sakal

त्यामुळे या सामन्यानंतर लखनौचा कर्णधार केएल राहुलने एक गमतीशीर प्रतिक्रिया दिली, ज्यामुळे अनेक क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहेत.

KL Rahul | X/LucknowIPL

तो सामन्यानंतर म्हणाला, आता मी माझ्या सासऱ्यांच्या टीममध्ये असणार आहे, आम्ही दोघेही आता टी20 वर्ल्ड कपमध्ये शर्माजीच्या मुलाला चिअर करणार आहोत.

KL Rahul | X/IPL

खरंतर आयपीएल 2024 सुरू झाले, तेव्हा एक जाहिरात आली होती, ज्यात केएल राहुलचे सासरे आणि अभिनेते सुनील शेट्टी मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज रोहित शर्माला म्हणजेच शर्माजींच्या मुलाला पाठिंबा देणार असल्याचे केएल राहुलला सांगत असल्याचे दिसले होते.

KL Rahul - suniel shetty | Instagram

ही जाहिरात बरीच चर्चेतही राहिली होती. त्यामुळे आता याच जाहिरातीचा संदर्भ घेत आयपीएल 2024 मधील आव्हान संपल्यानंतर केएल राहुलने तशी प्रतिक्रिया दिली.

KL Rahul | ANI

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की केएल राहुलला आगामी टी20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघात संधी मिळालेली नाही. पण रोहित शर्मा या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.

KL Rahul | X/BCCI

IPL 2024: ठरलं तर! हे चार संघ खेळणार प्लेऑफमध्ये

RCB | X/IPL
येथे क्लिक करा