ना औषधं, ना ऑपरेशन; 'हे' उपाय करतील गुडघेदुखी आणि संधिवातावर प्रभावी काम

Anushka Tapshalkar

हार्वर्ड डॉक्टरांचा सल्ला

हार्वर्ड हेल्थ पब्लिशिंगनुसार, गुडघेदुखी आणि संधिवातावर औषधांशिवाय उपाय प्रभावी ठरू शकतात. योग्य आधार, पाण्यातील व्यायाम आणि नियमित हालचाल यामुळे वेदना व जडपणा कमी होतो.

Doctor's Advice | sakal

गुडघा ब्रेस

योग्य गुडघा ब्रेस वापरल्यास सांध्यावरचा ताण कमी होतो. त्यामुळे चालताना स्थिरता मिळते, वेदना कमी होतात आणि दैनंदिन हालचाल सुलभ होते.

योग्य ब्रेस कसा वापरावा?

फिजिओथेरपिस्टच्या सल्ल्याने ब्रेस निवडावा. चालणे, जिने चढणे किंवा जास्त वेळ उभे राहणे अशा वेळी ब्रेस वापरणे अधिक फायदेशीर ठरते.

हायड्रोथेरपी

कोमट पाण्यात केलेला व्यायाम गुडघ्यांवरील दाब कमी करतो. पाण्याचा आधार आणि प्रतिकार यामुळे वेदना न वाढवता स्नायू मजबूत होतात.

पाण्यात व्यायाम कसा करावा?

१५–२० मिनिटे पाण्यात चालणे, पाय उचलणे किंवा हलका व्यायाम करा. आठवड्यातून २–३ वेळा हायड्रोथेरपी केल्यास जडपणा आणि सूज कमी होते.

नियमित व्यायाम

चालणे, सायकलिंग, पोहणे, योगा असे कमी ताण देणारे व्यायाम गुडघ्यांना आधार देणारे स्नायू मजबूत करतात आणि वेदना कमी करतात.

Exercises | Sakal

सातत्य ठेवा, वेदना दूर ठेवा

ब्रेस, पाण्यातील व्यायाम आणि नियमित हालचाल यांचा समतोल वापर केल्यास गुडघेदुखी नियंत्रणात राहते. सातत्य आणि योग्य मार्गदर्शनाने सांधे दीर्घकाळ निरोगी राहू शकतात.

Sakal

हिवाळ्यातही होतं डिहायड्रेशन? कसं ओळखायचं जाणून घ्या

Hydration Tips for Winter

|

sakal

आणखी वाचा