टॅप करा, ऐका, अन् खाण्या योग्य कलिंगड निवडा!

Aarti Badade

सर्वात गोड कलिंगड कसं निवडायचं?

उन्हाळ्याच्या ताजेपणासाठी योग्य गोडसर कलिंगड निवडण्याच्या या पद्धती लक्षात ठेवाच.

Watermelon | Sakal

पट्ट्यां

गडद आणि जवळजवळ पट्टे असलेलं कलिंगड अधिक गोड असतं. पसरलेले पट्टे अधिक पाणीदार असते व कमी चवदार असते.

Watermelon | Sakal

पिवळा डाग

खालच्या बाजूचा गडद पिवळा डाग म्हणजे कलिंगड पिकल्याचं लक्षण. पांढरा डाग म्हणजे कच्चं कलिंगड असते.

Watermelon | Sakal

आकार

गोलसर कलिंगडामध्ये गोडवा अधिक असतो. आयताकृती कलिंगड अनेकदा पाणीदार आणि कमी गोड लागतं.

Watermelon | sakal

नॉक टेस्ट – आवाजात सत्य

कलिंगड टॅप करताना खोल आवाज आला तर ते पिकलेलं, रसाने भरलेलं असतं. आवाज कमी आला तर, ते गोड चवदार नसते.

Watermelon | sakal

वजन

कलिंगड लहान असूनही जड वाटलं पाहिजे. जड म्हणजे अधिक रस, अधिक गोडवा.

Watermelon | Sakal

लक्षणे

पांढरे/हिरवे डाग, कच्चं कलिंगड,भेगा, छिद्रे दाणेदार पोत, चव कमी,पिवळा डाग नाही ही लक्षणे खाण्यायोग्य कलिंगड नसण्याची आहे.

Watermelon | Sakal

लक्षात ठेवा

गोलसर आकृती, गडद आणि अरुंद पट्टे, पिवळा डाग, खोल टॅप आवाज आणि जडपणा – हेच गोड कलिंगड निवडण्याची योग्य ट्रिक आहे.

Watermelon | Sakal

किवी खाण्याचे 7 आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे

Health Benefits of Eating Kiwi Daily | Sakal
येथे क्लिक करा