Sandeep Shirguppe
व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेल्या आवळ्याचे सेवन करण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.
आवळ्याला आयुर्वेदात अनन्य साधारण महत्व आहे. रोज एक आवळा खाल्ल्याने आजारांपासून बचाव करता येतो.
शरीराची इम्यूनिटी मजबूत करण्यासाठी आवळा सेवन करायला हवा.
सर्दी आणि ताप यांसारख्या किरकोळ आजारांपासून तुमचं रक्षण करण्यासाठी रोज एक आवळा खावा.
आवळ्यामध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यास मदत होते.
आवळा व्हिटॅमिन ए असल्याने दृष्टी सुधारते आणि मोतीबिंदू सारख्या समस्यांचा धोका कमी होतो.
आवळ्यात असणारे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट केसांचं पोषण करतात.
आवळा तुम्ही कच्चा खाऊ शकता किंवा आवळ्याचा मुरांबा, लोणचं, ज्यूस बनवून सेवन करू शकता.