Aarti Badade
"ग्यानबा-तुकाराम" हा गजर म्हणजे वारीचे हृदय आहे. पण हा गजर नेमका कोणी सुरू केला?
वारीमध्ये आधी फक्त "विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल" असाच आवाज होत असे. संतांची नावे जास्त घेतली जात नव्हती.
जवळपास दोनशे वर्षांपूर्वी पंढरपूरमध्ये केशवराव बडवे नावाचे एक रसिक भक्त होते. त्यांना वाटले, ज्या संतांनी वारकरी संप्रदाय बनवला, त्यांचा गजर व्हायला नको का?
केशवराव बडवे यांना वाटले, संत ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला आणि संत तुकारामांनी कळस चढवला. मग या संतांची आठवण गजरात का नको?
बडवे यांनी एक दिवस "ज्ञानोबा-तुकाराम, ज्ञानोबा-तुकाराम" असे म्हणायला सुरुवात केली. हळूहळू इतर वारकऱ्यांनीही तो आवाज उचलला.
सुरुवातीला तो भजनात, मग दिंडीत आणि नंतर संपूर्ण वारीत पसरला. हा गजर इतका आवडला की तो प्रत्येक वारकऱ्यांच्या तोंडी बसला.
आज "ग्यानबा-तुकाराम" या दोन शब्दांशिवाय वारी अपूर्ण वाटते. वारीत प्रत्येक टाळाच्या आणि पावलासोबत हा गजर ऐकू येतो.
हा गजर म्हणजे संत परंपरेला आदर देणे आहे. ज्ञानेश्वरांचा विवेक आणि तुकारामांचा भाव या गजरातून लोकांपर्यंत पोहोचतो.