Mansi Khambe
मनुका आरोग्यासाठी एक उत्तम पर्याय असून मनुके रात्री पाण्यात भिजवून सकाळी उठून उपाशीपोटी खाल्ल्यास अनेक फायदे होतात.
मनुक्यांमध्ये उच्च प्रमाणात फायबर असते. जे आतड्यांना काम करण्यास मदत करतात. यामुळे दररोज पाण्यात भिजवलेले मनुका खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मनुका खाणे महत्त्वाचे ठरते.
मनुक्यांमध्ये ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.
मनुका खाल्ल्याने कोलेस्टरॉल कमी होतो. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते .
मनुक्यांमध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि लोहामुळे केसगळती रोखण्यास मदत मिळते.
मनुक्यात विटामिन ए, बीटा कॅरोटीन आणि एंटी-ऑक्सिडंट गुण असतात. यामुळे डोळ्यांच्या समस्या दूर होतात.
मनुक्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो ज्यामुळे रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळते.