'पुढच्या वर्षी लवकर या' म्हणताय..., पण २०२६मध्ये कधी होणार गणेशाचं आगमन? तारीख आताच पाहून घ्या

Mansi Khambe

गणरायाचे विसर्जन

अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यभरातील घरगुती तसेच सार्वजनिक मंडळातील गणपतींना निरोप देण्यात येत आहे. गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला निरोप देण्यासाठी भाविकांची गर्दी झाली आहे.

Ganesh Chaturthi 2026

|

ESakal

भावपूर्ण निरोप

ढोल ताशासह 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...' असे म्हणत भाविक गणरायाचे थाटामाटात विसर्जन करत आहेत. मात्र गणेशाला भावपूर्ण निरोप दिल्यानंतर आता पुढच्या वर्षी श्रींचे आगमन कधी होणार, याकडे लक्ष लागले आहे.

Ganesh Chaturthi 2026

|

ESakal

गणेश चतुर्थी २०२६

या वर्षी गणेशोत्सव ऑगस्ट महिन्यात सुरू झाला. पण पुढच्या वर्षी गणपतीचे उशिरा आगमन होणार आहे. पुढच्या वर्षी म्हणजेच २०२६ मध्ये गणेश चतुर्थी कधी असणार आहे, याची तारीख जाणून घ्या...

Ganesh Chaturthi 2026

|

ESakal

तारीख काय

हिंदू कॅलेंडरप्रमाणे, २०२६ या वर्षी सोमवार १४ सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होणार आहे. म्हणजेच या वर्षीच्या तुलनेत पुढील वर्षी बाप्पाच्या आगमनासाठी १८ दिवस जास्त वाट पहावी लागणार आहे.

Ganesh Chaturthi 2026

|

ESakal

अधिक महिना

पुढच्या वर्षी ज्येष्ठ अधिक महिना येणार असल्याने गणपती बाप्पाचे आगमन १८ दिवस उशिरा म्हणजेच १४ सप्टेंबरला होणार आहे. यावेळी हरितालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी येणार आहे.

Ganesh Chaturthi 2026

|

ESakal

मुहूर्त

भाद्रपद शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी १४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.०६ वाजता सुरू होईल आणि १५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ७.४४ वाजता संपेल. तर गणेश पूजेचा मुहूर्त सकाळी ११:०२ ते दुपारी ०१:३१ आहे.

Ganesh Chaturthi 2026

|

ESakal

गौरी आगमन

१४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून चौथ्या दिवशी म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी गौरी आवाहन आहे. तर दुसऱ्या दिवशी १८ सप्टेंबर रोजी गौरी पूजन होईल. तर १९ सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन होईल.

Ganesh Chaturthi 2026

|

ESakal

अनंत चतुर्थी

वाजत-गाजत आणि ढोल ताशांच्या गजरात गणरायाचे आगमन झाल्यावर प्राणप्रतिष्ठा केली जाते. घरगुती गणपती दीड, पाच, सात दिवसांचे असतात. तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे विसर्जन १० दिवसांनी करण्यात येते.

Ganesh Chaturthi 2026

|

ESakal

लोक अदालतमध्ये कोणत्या प्रकरणांची सुनावणी होते?

Lok Adalat

|

ESakal

येथे क्लिक करा