Mansi Khambe
लोक अदालत ही भारतातील कायदेशीर सेवा प्राधिकरण कायदा, १९८७ अंतर्गत एक वैधानिक संस्था आहे. पारंपारिक न्यायालयीन प्रणालीबाहेर वाद/तक्रारी सोडवण्यासाठी भारतात पर्यायी वाद निवारण यंत्रणा म्हणून ती तयार करण्यात आली.
Lok Adalat
ESakal
लोक अदालत हे वादांचे सौहार्दपूर्ण निराकरण करण्यासाठी एक पर्यायी व्यासपीठ आहे. याठिकाणी कायदेशीर निर्णयाने नव्हे तर परस्पर संमतीने प्रकरणे सोडवली जातात.
Lok Adalat
ESakal
मात्र या लोक अदालतमध्ये कोणते प्रकरण ऐकले जातात याबाबत जाणून घ्या
Lok Adalat
ESakal
लोक अदालत प्रामुख्याने दिवाणी प्रकरणे आणि फौजदारी प्रकरणे ऐकतात जी तडजोडीने ऐकली जाऊ शकतात
Lok Adalat
ESakal
यामध्ये मालमत्तेशी संबंधित प्रकरणे, आर्थिक वाद आणि कौटुंबिक बाबी यासारख्या सर्व प्रकारच्या दिवाणी प्रकरणांचा समावेश आहे. तसेच कायद्यानुसार तडजोड करता येणारे फौजदारी प्रकरणे देखील येथे सुनावली जातात.
Lok Adalat
ESakal
नॅशनल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट (NI Act) च्या कलम १३८ अंतर्गत येणाऱ्या चेक बाउन्सची प्रकरणे लोक अदालतींमध्ये निकाली काढली जातात.
Lok Adalat
ESakal
त्याचबरोबर कोणत्याही न्यायालयात दाखल न झालेले वाद जे दाखल करण्यास पात्र आहेत, ती प्रकरणे देखील येथे ऐकली जातात. ज्यामध्ये वाहतूक चलन, बँक वसुली आणि विमा दाव्यांशी संबंधित वादांचा देखील समावेश आहे.
Lok Adalat
ESakal
लोक अदालत वादांवर सामंजस्याने तोडगा काढण्याचे माध्यम आहे.
Lok Adalat
ESakal
लोक अदालतीने दिलेला निर्णय हा दिवाणी न्यायालयाचा आदेश मानला जातो, तो अंतिम आणि सर्व पक्षांवर बंधनकारक असतो आणि त्याविरुद्ध अपील करता येत नाही.
Lok Adalat
ESakal
Beach sand
ESakal