Mansi Khambe
भारतात रिक्षांचा इतिहास नवीन नाही. रस्त्यावर वाहने नसतानाही रिक्षा अस्तित्वात होत्या. पूर्वी रिक्षांना सायकलचीही आवश्यकता नव्हती. ती मानव ओढत असे. काळ बदलला आणि रिक्षाही बदलल्या.
आयुष्यात कधीच रिक्षात बसला नसेल असा कोणी नसेल. तंत्रज्ञानाने खूप प्रगती केली असली तरी बालपणी शाळेत जाण्यात किंवा रिक्षाने थोडे अंतर प्रवास करण्यात एक वेगळीच मजा असायची.
मात्र 'रिक्षा' हा शब्द कुठून आला याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? त्याचा नेमका अर्थ काय आहे? याचे उत्तर आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
मनोरंजक गोष्ट म्हणजे तेव्हापासून रिक्षा तशीच राहिली आहे. वाहनांचे तंत्रज्ञान बदलत असले तरी, आजही रिक्षा ट्रेंडमधून बाहेर पडलेली नाही. काही ठिकाणी तुम्हाला सजवलेल्या रिक्षा दिसतील तर काही ठिकाणी थोड्या आधुनिक रिक्षा दिसतील.
काही लोकांना हा हिंदी किंवा मराठी शब्द वाटतो, पण तो हिंदी किंवा मराठी शब्द नाही. काहींना तो इंग्रजी शब्द वाटतो कारण तो इंग्रजी शब्दकोशात आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हा शब्द इंग्रजी शब्दही नाही.
मग हा शब्द कुठून आणि कोणत्या भाषेतून आला?खरंतर, रिक्षा हा एक जपानी शब्द आहे. जो तीन वेगवेगळ्या शब्दांपासून बनलेला आहे.
जपानी भाषेत या वाहनाला जिनरिक्षा (人力車) म्हणतात. हा शब्द तीन जपानी शब्दांपासून बनलेला आहे: १ - जिन (人) म्हणजे मानव, २ - रिकी (力) म्हणजे शक्ती आणि ३ - शा (車) म्हणजे वाहन.