मुंबईत वसलंय दक्षिण भारतीय भक्ती, संस्कृती आणि उत्सवांचे केंद्र; तुम्हाला याविषयी माहिती आहे का?

Mansi Khambe

संस्कृती आणि वारशाचे प्रतिबिंब

आधुनिकतेसाठी ओळखले जाणारे मुंबई शहर, भारताच्या संस्कृती आणि वारशाचे प्रतिबिंब असलेल्या अनेक गोष्टी जतन करून ठेवते. दक्षिण मुंबई ब्रिटिशकालीन इमारती आणि ऐतिहासिक स्थळांनी भरलेली आहे.

South Indian Temple

|

ESakal

माटुंगा पूर्व स्टेशन

असेच एक ठिकाण म्हणजे शहराच्या मध्यभागी असलेले माटुंगा. माटुंगा पूर्व स्टेशनपासून थोड्या अंतरावर द साउथ इंडियन भजन समाज नावाचे एक मंदिर आहे.

South Indian Temple

|

ESakal

द साउथ इंडियन भजन समाज

हे ठिकाण तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सारख्या ठिकाणांच्या संस्कृतीचे जतन करते. हे तीन मजली मंदिर दक्षिण भारतीय राज्यांमध्ये एक सामान्य दृश्य आहे.

South Indian Temple

|

ESakal

दक्षिण भारतीय

या मंदिराला भेट दिल्याने तुम्हाला केरळमध्ये असल्यासारखे वाटेल. दक्षिण भारतीय भजन समाजाची सुरुवात १९२७ मध्ये झाली.

South Indian Temple

|

ESakal

डॉ. राज गोपाल

या मंदिराचे सचिव डॉ. राज गोपाल सांगतात की, १९०० च्या सुमारास जेव्हा दक्षिण भारतातील लोक कामाच्या शोधात मुंबईत येऊ लागले. तेव्हा माटुंगा म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण हळूहळू दक्षिण भारतीयांचे केंद्र बनले.

South Indian Temple

|

ESakal

भजन आणि कीर्तन

लोक येथे भजन आणि कीर्तन करत असत. जे हळूहळू वाढत गेले. मग असे वाटले की, मुंबईसारख्या शहरात दक्षिणेकडील बाहेरील लोकांची संस्कृती आणि भक्ती जिवंत ठेवणारी समाजाची स्थापना करावी.

South Indian Temple

|

ESakal

दक्षिण भारतीय मंदिरे

आज या भागात अनेक दक्षिण भारतीय मंदिरे आणि इतर संस्था आहेत. या मंदिरात दररोज पारंपारिक पूजा आणि आरत्या केल्या जातात. वार्षिक उत्सवादरम्यान हवन आणि इतर विधी देखील केले जातात.

South Indian Temple

|

ESakal

रामनवमी आणि नवरात्र

यावेळी तुम्हाला मुंबईत राहणारे दक्षिण भारतीय आढळतील. या मंदिरात रामनवमी आणि नवरात्र मोठ्या थाटामाटात साजरे केले जातात.

South Indian Temple

|

ESakal

भिंती विशेषतः डिझाइन

मंदिराच्या भिंती विशेषतः डिझाइन केलेल्या आहेत. ज्यामध्ये विविध देवतांच्या 3D शिल्पे आहेत. ज्यामुळे ते अधिक आकर्षक आणि सांस्कृतिक बनते.

South Indian Temple

|

ESakal

'इथे' इडली-डोसासोबत चिकन ग्रेव्ही दिली जाते, मुंबईतील 'या' खास जागी तुम्ही कधी गेलात का?

Mumbai Food

|

ESakal

येथे क्लिक करा