Mansi Khambe
घर किंवा इमारतीच्या छतावर पाण्याच्या टाक्या लावल्या जातात. त्या टाक्यांना अनेक पाईप जोडले असतात, ज्यामुळे प्रत्येक घराला पाणीपुरवठा केला जातो.
Air vent pipe
ESakal
पाण्याच्या टाक्यांना जोडलेल्या पाईपांमध्ये एक खुला पाईप असतो ज्याची एक बाजू जोडलेली तर दुसरी खुली असल्याचे दिसून येते. पण तो कशासाठी असतो आणि त्याचे काम काय असते, हे तुम्हाला माहीत आहे का?
Air vent pipe
ESakal
हा पाईप पाण्याच्या टाकीच्या आउटलेट पाईपला आणि त्याच्या संबंधित जोडण्यांना जोडलेला असतो. या पाईपला वॉटर लाईनचा एअर व्हेंट किंवा एअर व्हेंट रिलीज अरेंजमेंट म्हणतात.
Air vent pipe
ESakal
पाण्याच्या टाकीच्या डिलिव्हरी लाईन्समध्ये, म्हणजेच आउटलेट लाईन्समध्ये वापरली जाते. पाईपमध्ये अडकलेली हवा बाहेर काढणे आणि आवश्यकतेनुसार हवा आत येऊ देणे, यासाठी तो बसवण्यात येतो.
Air vent pipe
ESakal
या पाईपमुळे टाकीमधील एअर-लॉकच्या समस्या कमी होऊ शकतात आणि वॉटर लाईनमधील प्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते.
Air vent pipe
ESakal
कधीकधी वाऱ्यामुळे पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होत असताना वरच्या बाजूला असलेला हा उघडा पाईप अडकलेल्या हवेला बाहेर पडू देतो.
Air vent pipe
ESakal
जेव्हा पाईपातून पाणी खाली वाहत असते आणि आत निर्वात पोकळी (व्हॅक्यूम) निर्माण होते, तेव्हा हे छिद्र हवा आत येण्यासही मदत करू शकते. यामुळे याला सामान्यतः एअर व्हेंट पाईप किंवा ब्रीदर पाईप म्हटले जाते.
Air vent pipe
ESakal
बरेच लोक याला टाकीचा ओव्हरफ्लो पाईप समजतात. जो टाकी भरल्यावर ओव्हरफ्लो पाईप अतिरिक्त पाणी बाहेर टाकतो. परंतु हा पाईप हवेसाठी मार्ग उपलब्ध करून देतो. त्यामुळे तो वरच्या बाजूने खुला असणे गरजेचे असते.
Air vent pipe
ESakal
तसेच याचे कार्य सांडपाण्यातील दुर्गंधी आणि वायू काढून टाकणे हे आहे आणि तो घराच्या छतावर बसवला जातो, ज्यामुळे सांडपाण्यातील दुर्गंधी छतावरील हवेत सोडली जाते.
Air vent pipe
ESakal
SRIDEVI last photo
esakal