रोहित कणसे
लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्या आघाडीने उत्तर प्रदेशात ८० पैकी ४३ जागा जिंकल्या, यामध्ये मैनपुरी लोकसभा जागेवरून डिंपल यादव देखील विजयी ठरल्या.
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव या चार वेळा खासदार झाल्या आहेत.
पहिल्यांदा २०१२ मधअये कन्नौज येथून त्यांनी लोकसभेची निवडणूक जिंकली तर दुसऱ्यांदा २०१४ मध्ये त्या पुन्हा निवडणून आल्या.
त्यानंतर २०२२ मध्ये मैनपुरी येथून लोकसभा लढवली आणि विजय मिळवला त्यानंतर २०२४ ला त्या पुन्हा विजयी ठरल्या आहेत.
डिंपल यादव नेमक्या कितवी शिकल्यात? याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
डिंपल यादव यांचा जन्म १५ जानेवारी १९७८ रोजी महाराष्ट्रातील पुण्यात झाला, त्यांचे वडिल राम चंद्र सिंह रावत भारतीय लष्करात कर्नल होते.
डिंपल यादव यांचं कुटुंब मुळतः उत्तराखंड येथील असून त्यांचे शिक्षण अनेक ठिकाणी झालं आहे.
डिंपल यादव यांचे शालेय शिक्षण पुणे, भठिंडा, अंदमान आणि निकोबार तसेच आर्मी पब्लिक स्कूल मध्ये झालं आहे.
इंटरमीडियट पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर डिंपल यादव लखनौ यूनिव्हर्सीटीत प्रवेश घेतला, तेथे त्यांनी कॉमर्स विषयात पदवी घेतली.
प्राजक्ता माळी राजकारणात जाणार का?