Mansi Khambe
देशभरात डीमार्टमध्ये सर्वात स्वस्त सामान मिळतं. पैसे वाचवण्यासाठी आजकाल सगळेच DMart मधून महिन्याभरातील सामान खरेदी करतात.
नव्या आणि विकसित होत असलेल्या शहरांमध्ये मेट्रो शहरांपर्यंत, डीमार्ट प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे.
घरात घालणारे कपडे आणि किराण्याचे सामान देखील लोकं डीमार्टमधून खरेदी करतात. ऑनलाइन शॉपिंगच्या काळात मोठे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सला डीमार्ट टक्कर देत आहे.
डीमार्टमधून दररोज हजारो लोक स्वस्त सामानांची खरेदी करतात. पण डीमार्टला हे कसं परवडतं? यात त्यांना कसा फायदा होतो? ते जाणून घ्या
डीमार्टच्या यशामागे राधाकिशन दामानी यांनी लावलेली युक्ती आहे. दिवंगत दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला देखील यांना गुरु मानत होते.
डीमार्टचे स्टोर त्यांच्या जमिनीवरच उभारले जाते. जेणेकरून त्यांना नेहमी भाडं देण्याची काळजी नसते.
डीमार्ट कंपनीकडून सामान घेताना त्यांना लगेच पैसे देतात, ज्यामुळे त्यांना त्या मालावर डिस्काऊंट घेता येतो.
काही कंपन्यांमधून प्रोडक्टला चांगल्या पद्धतीने डिस्प्ले करण्यासाठी त्यांना आणखी चांगली सूट मिळते.
ग्राहकांना डोळ्यासमोर जे दिसतं ते सामान खरेदी करतात. त्यामुळे रॅकमध्ये कंपन्यांना त्यांचे प्रॉडक्ट योग्य जागेवर ठेवण्यासाठी ते विकून डीमार्ट पैसे कमावते.
या गोष्टींमुळे डीमार्ट त्यांच्या खर्चावर 5-7 टक्के वाचवतो आणि त्याला डिस्काउंट म्हणून ग्राहकांना देतो.