सकाळ डिजिटल टीम
भक्त पुंडलिकाने टाकलेल्या सुमारे एक चौरस फूट आकाराच्या विटेवर विठूराय दोन्ही पाय समसमान (समचरण) ठेवून उभा आहे. विठ्ठलाच्या या देखण्या मूर्तीची उंची सुमारे ३ फूट ९ इंच आहे.
Standing in Equal Balance (Samacharan) on a Brick
sakal
विठ्ठलाच्या हातात कोणतेही शस्त्र नाही.त्यांच्या मनगटात दोन-दोन कडी आहेत. दोन्ही हात कमरेवर ठेवून, अत्यंत शांत आणि करुणामयी मुद्रेने देव आपल्या भक्तांची वाट पाहत उभा आहे.
Both Hands Placed on the Waist
sakal
विठ्ठलाच्या मस्तकावर 'शिवलिंग' आकाराचा मुकुट आहे. हे रूप शैव (शिवभक्त) आणि वैष्णव (विष्णुभक्त) या दोन्ही पंथांच्या अभेद्य ऐक्याचे प्रतीक मानले जाते.
The Sacred 'Shivalinga' on the Crown
sakal
विठ्ठलाच्या छातीवर एका पायाचा ठसा उमटलेला आहे. पुराणातील कथेनुसार, भृगु ऋषींनी भगवान विष्णूच्या छातीवर मारलेल्या लाथेची ही खूण (भृगुलांछन) मानली जाते.
The Historic 'Bhrigu-lanchan' on the Chest
sakal
डाव्या हातात 'शंख' आणि उजवा हात उपडा (पालथा) असून त्याचा अंगठा बांधलेला आहे.त्यात कमळपुष्पाचा देठ धरलेला आहे. कानात माशाचा आकार असणारी 'मकरकुण्डले' असून ती विठ्ठलाचे सौंदर्य अधिकच खुलवतात.
Conch, Lotus, and Divine Ornaments
sakal
विठूरायाच्या गळ्यात दुर्मिळ असा 'कौस्तुभ मणी' आहे तसेच गळ्यात कोरलेला कंठा स्पष्ट दिसतो.कमरेला तिहेरी मेखला बांधलेली आहे.(ज्याला आपण करदोडा म्हणतो)
Kaustubh Mani, Carved Necklace, and Mekhala
sakal
ही मूर्ती संपूर्ण काळ्या रंगाची नसून अल्पशी करडी आहे. तिची घडण वालुकामय (खडबडीत दगडाची) आहे. विठ्ठलाच्या दोन्ही पायांच्या मधोमध एक 'घुंगुरवाळी काठी' कोरलेली आढळते.
The Anklet-Bell Staff and the Idol's True Color
sakal
पंढरीचा विठ्ठल ही केवळ एक मूर्ती नसून, तो कोट्यवधी वारकऱ्यांचा प्राण आणि अखंड महाराष्ट्राच्या भक्तीचा जिवंत झरा आहे!
Sunder Te Dhyan (The Beautiful Form)
sakal