Mansi Khambe
भाऊ आणि बहिणीमधील नाते अद्वितीय आहे. यामुळे भावंडांच्या प्रेमासाठी समर्पित रक्षाबंधन सण साजरा करण्यात येतो. हा हिंदू सण भारत आणि नेपाळसारख्या देशांमध्ये भाऊ आणि बहिणीमधील प्रेमाचे प्रतीक म्हणून साजरा करतात.
रक्षाबंधन हा सण हिंदू चंद्र-सौर कॅलेंडरच्या श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो, जो सामान्यतः ग्रेगोरियन कॅलेंडरच्या ऑगस्ट महिन्यात येतो.
रक्षाबंधन हा सण "रक्षा" आणि "बंधन" या दोन शब्दांपासून बनलेला आहे. संस्कृत भाषेत या सणाचा अर्थ "संरक्षणाची गाठ" असा होतो जिथे "रक्षा" म्हणजे संरक्षण आणि "बंधन" म्हणजे बांधणे.
यंदा ९ ऑगस्ट रोजी रक्षाबंधन सण साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी बहीण तिच्या भावाच्या मनगटावर राखी बांधते. त्याच्या समृद्धीसाठी, आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करते. त्या बदल्यात भाऊ भेटवस्तू देतो.
पण रक्षाबंधनाचा सण श्रावण पौर्णिमेच्या दिवशीच का साजरा केला जातो? यामागचे कारण आणि काय कथा आहेत त्या जाणून घ्या...
रक्षाबंधनाचा सण श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो कारण या दिवशी हिंदू धर्मानुसार श्रावण महिना पूर्ण होतो आणि तो एक अत्यंत शुभ काळ मानला जातो.
पुराणांमध्ये असेही म्हटले आहे की, या दिवशी देवते आणि ऋषी-मुनींनी आपली शक्ती वाढवण्यासाठी उपास्य विधी केले होते, म्हणूनच या दिवशी राखी बांधणे अत्यंत शुभ मानले जाते.
कृष्णाच्या बोटातून रक्त वाहताना पाहून द्रौपदीने तिची साडी फाडून त्याभोवती गुंडाळली. त्या बदल्यात, भगवान श्रीकृष्णाने तिला कोणत्याही संकटाच्या वेळी मदत करण्याचे वचन दिले. महाभारतानुसार, कौरवांनी तिचे वस्त्रहरण केले तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अखेर तिला मदत केली.
दुसरी कथा देवी लक्ष्मी आणि राजा बळी यांच्याशी संबंधित आहे. जेव्हा बळीने आपले संपूर्ण राज्य वेशात आलेल्या स्वामीला दिले तेव्हा भगवान विष्णू त्यांच्यावर आनंदी होत राजाला आशीर्वाद दिला आणि पुन्हा त्याच्या राजवाड्याचा द्वारपाल म्हणून वेष धारण केला.