Mansi Khambe
मुंबईची जीवनवाहिनी मानली जाणाऱ्या लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. रेल्वे प्रवास सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी रेल्वे सर्व सुरक्षा उपायांचे पालन करते.
या प्रवासादरम्यान अनेकांना रेल्वेचे काम, नियंत्रण, यंत्रणा बिघाड असे अनेक प्रश्न पडतात. अशातच रेल्वे प्लॅटफॉर्मवर पिवळ्या रंगाची पट्टी का असते. त्याचा उपयोग काय? असाही प्रश्न पडतो.
रेल्वे प्रवास करताना संपूर्ण प्लॅटफॉर्मवर एक पिवळा पट्टी असल्याचे पहिले असेलच. काही ठिकाणी पिवळा रंग तर काही रेल्वे प्लॅटफॉर्मवर पिवळ्या टाइल्सने पट्टी बनवली असते.
पण ही पिवळी पट्टी बनवण्याचा उद्देश काय आहे? त्याचा उपयोग काय? ती पट्टी कोणी आणि का बनवली याविषयी विस्ताराने माहिती जाणून घ्या.
ट्रेन प्लॅटफॉर्मवर येताच ट्रेनमध्ये चढण्यासाठी प्रवासी रेल्वे ट्रॅकच्या अगदी जवळ पोहोचतात. पण ही पिवळी पट्टी ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोचल्यावर तुम्हाला पिवळ्या पट्टीच्या मागे राहावे लागेल याचे संकेत देते.
खरंतर, ट्रेन प्लॅटफॉर्मवर पोहोचते तेव्हा ती जोरदार हवेच्या दाबाने स्वतःकडे खेचते. अशा परिस्थितीत, प्रवाशांना ट्रेनने धडकण्यापासून वाचवण्यासाठी पिवळी पट्टी बनवली जाते.
तसेच, ही पिवळी पट्टी पृष्ठभागावरून थोडीशी वर केली जाते. जर कोणताही दृष्टिहीन व्यक्ती ट्रेन पकडण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उपस्थित असेल तर तो पुढे चालताना रेल्वे ट्रॅकवर पडू नये.
प्लॅटफॉर्मवर उभे असलेले लोक आणि ट्रेनमध्ये चढणारे आणि उतरणारे यांच्यात पद्धतशीर जागा या मार्गामुळे ठरवता येते.
प्रवाशांना प्लॅटफॉर्मचे धोके आणि नियमांची आठवण करून देण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पिवळी पट्टी एक उत्तम मार्ग आहे.