रेल्वे रुळांमध्ये अंतर का असते? कारण जाणून थकीत व्हाल

Mansi Khambe

भारतीय रेल्वे

रेल्वेचा वेग, डब्यांची रचना, स्थानके आणि रुळांपर्यंत, रेल्वेशी संबंधित अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण दररोज पाहतो, पण त्यामागील कारण फार कमी लोकांना माहीत असते.

Railway Track Gap

|

ESakal

फट

अशीच एक गोष्ट म्हणजे रेल्वे रुळांच्या मध्ये दिसणारी लहान फट. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, जिथे दोन रूळ जोडले जातात, तिथे त्यांच्यामध्ये एक लहान जागा सोडलेली असते.

Railway Track Gap

|

ESakal

संभाव्य धोका

ही जागा पाहता रेल्वे रुळावरून घसरण्याचा संभाव्य धोका वाटतो. पण प्रत्यक्षात, अपघात टाळण्यासाठी ही फट ठेवली जाते.

Railway Track Gap

|

ESakal

रेल्वे रूळ

रेल्वेचे रूळ प्रामुख्याने स्टीलचे बनलेले असतात. स्टील हा एक धातू आहे आणि धातूंचा हा गुणधर्म असतो की तापमान वाढल्यावर त्याचा विस्तार होतो, तर तापमान कमी झाल्यावर आकसले जाते.

Railway Track Gap

|

ESakal

बदल

हा बदल लहान वाटू शकतो, परंतु जेव्हा अनेक किलोमीटर पसरलेल्या रेल्वे मार्गाचा विचार केला जातो, तेव्हा त्याचा परिणाम लक्षणीय असू शकतो. म्हणूनच रूळ एकमेकांना पुरेशा अंतराने जोडले जातात.

Railway Track Gap

|

ESakal

रूळावरील फट

जर रुळ पूर्णपणे एकत्र जोडले असते आणि त्यांच्यामध्ये कोणतीही जागा सोडली नसती तर रुळांवर अतिरिक्त दाब निर्माण होऊ शकतो.

Railway Track Gap

|

ESakal

वाढता दाब

या वाढलेल्या दाबामुळे रुळांची स्थिती बदलली असती. ज्याने रेल्वेगाड्यांना धोका निर्माण झाला असता.

Railway Track Gap

|

ESakal

तापमानातील बदल

तापमानातील बदलांनुसार रुळांमधील फटीचे आकारमान बदलू शकते. उन्हाळ्यात रुळांचा काहीसा विस्तार होतो, तर हिवाळ्यात ते आकसले जातात.

Railway Track Gap

|

ESakal

रेल तंत्रज्ञान

पूर्वी, लहान रुळांमध्ये अंतर ठेवून त्यांना जोडून रेल्वेमार्ग तयार केले जात असत. तथापि, आता अनेकस्थळी लांब वेल्डेड रेल आणि सलग वेल्डेड रेल तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.

Railway Track Gap

|

ESakal

रचना

या तंत्रज्ञानामध्ये, रुळांचे अनेक भाग वेल्ड करून एक लांब, जवळजवळ सलग रुळाचा भाग तयार केला जातो. तापमानामुळे होणारी हालचाल नियंत्रित करता यावी, अशा प्रकारे रेल्वेमार्गांची रचना आणि सुरक्षितता केली जाते.

Railway Track Gap

|

ESakal

अभियांत्रिकीचा भाग

पुढच्या वेळी जेव्हा तुम्हाला रुळांमध्ये एक लहान फट दिसेल, तेव्हा आश्चर्यचकित होऊ नका. ही फट रेल्वे अभियांत्रिकीचा एक महत्त्वाचा भाग आहे. जी रेल्वेगाड्यांच्या सुरक्षित वाहतुकीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

Railway Track Gap

|

ESakal

रेल्वे रुळांवर दगडं का टाकली जातात असतात? ती काढली तर काय होणार?

Railway Track Ballast

|

ESakal

येथे क्लिक करा