Mansi Khambe
पावसाळ्यात झाडांवर वीज कोसळण्याच्या घटना अनेकदा घडतात. ज्यामुळे लोकांना धक्का बसतो. मात्र तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, वीज जास्त झाडांवरच का पडते?
तर आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर सांगणार आहोत. झाडे उंच असतात आणि थेट जमिनीशी जोडलेली असतात.
ज्यामुळे त्यांना वीज कोसळण्याची शक्यता जास्त असते. वीज नेहमीच जवळच्या आणि सर्वात उंच वस्तूकडे आकर्षित होते.
तसेच मोकळ्या जागेत झाडे वीजेचे सोपे लक्ष्य बनतात. झाडांमध्ये असलेले पाणी आणि आर्द्रता त्यांना चांगले वाहक बनवते. त्यामुळे वीज त्यांच्यामधून सहजपणे जाते.
वीज पडल्यामुळे झाडाचा मोठा भाग जळू शकतो किंवा आग लागू शकते. जे अत्यंत धोकादायक आहे.
जेव्हा वीज चमकते तेव्हा ती पृथ्वीवर पोहोचण्यासाठी सर्वात लहान मार्ग शोधते. मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या एकाच झाडावर वीज पडण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.
शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, 1 वीज पृथ्वीची ऊर्जा संतुलित करण्यासाठी अशा प्रक्रियेचा अवलंब करते.
झाडाखाली उभे राहणे देखील धोकादायक असू शकते. वीज पडल्यास जीवाला धोका असू शकतो.
जर मुसळधार पाऊस आणि विजा पडत असतील तर झाडापासून काही अंतर ठेवून सुरक्षित ठिकाणी राहणे चांगले.