Mansi Khambe
नवरात्रीत भाविक नवरंगच नाही तर नऊ दिवस उपवासही करतात. त्याचाच एक भाग म्हणून अनेक जण नवरात्रीत अनवाणी चालताना दिसतात.
barefoot
ESakal
नवरात्रीत अनेक भाविक अनवाणी का राहतात आणि ही प्रथा कशी आणि कधीपासून सुरू झाली त्याबद्दल जाणून घ्या.
barefoot
ESakal
नवरात्रीत अनवाणी राहण्यामागे धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक कारणे आहेत. या काळात, जमिनीशी थेट संपर्क साधून शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते. तसेच गरजा पूर्ण करून काही गोष्टी त्याग करण्याची शिकवण मिळते, असे मानले जाते.
barefoot
ESakal
नवरात्रीच्या काळात शरद ऋतू सुरू होतो, जो व्हिटॅमिन डी मिळवण्यासाठी चांगला काळ मानला जातो. अनवाणी चालल्याने सूर्यकिरणांमधून व्हिटॅमिन डी मिळते.
barefoot
ESakal
पावसाळ्यात शरीरात सर्दी-खोकल्याचा त्रास वाढण्याची शक्यता असते. अनवाणी चालल्यामुळे पायातून होणारी ही उष्णता शरीराचे तापमान संतुलित ठेवते आणि शरीरातील थंडी कमी करून उष्णता वाढवते.
barefoot
ESakal
नवरात्रीत घटस्थापना करताना घटाभोवती मातीचा ओटा तयार करून त्यात धान्याची रुजवण घालतो. यामुळे आपण मातीच्या आणि पर्यायाने निसर्गाच्या संपर्कात येतो. मातीशी आपला ऋणानुबंध कायम राहावा, या हेतून भाविक नवरात्रीत अनवाणी राहतात.
barefoot
ESakal
उत्सव हे चांगल्या कार्याची सुरुवात करण्याचे निमित्त असते. त्या मुहूर्तावर चांगल्या सवयी लावून घ्याव्या तसेच चांगल्या कामासाठी योगदान देता यावे असा हेतू असतो.
barefoot
ESakal
अलीकडे काहीजण नवरात्रीत अनवाणी चालणं ही गोष्ट ट्रेंड म्हणून पाहतात आणि केल्या जातात. त्यामुळे व्यक्तीला याबाबत कसलीही माहिती नसते. परिणामी अशावेळी धर्म संस्कृतीवर देखील प्रश्नचिन्ह उभे केले जाते.
barefoot
ESakal