Mansi Khambe
बरेच लोक दिवसाची सुरुवात चहाने करतात, परंतु रिकाम्या पोटी चहा पिणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.
सकाळी रिकाम्या पोटी शरीराची पचनसंस्था सर्वात जास्त संवेदनशील असते. अशा परिस्थितीत, चहामध्ये असलेले कॅफिन, टॅनिन आणि आम्लयुक्त घटक पोटाला नुकसान पोहोचवू शकतात. यामुळे पोटाच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
रिकाम्या पोटी चहा पिल्याने कोणत्या समस्या होऊ, आणि चहा पिण्याची योग्य वेळ काय? याबाबत जाणून घ्या.
रिकाम्या पोटी चहा पिल्याने पोटात हायड्रोक्लोरिक अॅसिडचे उत्पादन वाढते, ज्यामुळे अॅसिडिटी आणि गॅस होतो. असे सतत केल्याने पोटाचे आवरण पातळ होऊ लागते, ज्यामुळे गॅस्ट्र्रिटिस होऊ शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
चहामध्ये असलेले कॅफिन शरीरातील चयापचय असंतुलित करू शकते. रिकाम्या पोटी ही प्रक्रिया आणखी बिकट होते, ज्यामुळे भूक कमी लागते, थकवा येतो आणि पोषक तत्वांचे शोषण कमी होते. त्यामुळे शरीर कमकुवत वाटते.
चहामध्ये असलेले टॅनिन शरीरात लोहाचे शोषण रोखते. जर तुम्ही दररोज रिकाम्या पोटी चहा प्यायलात तर हळूहळू शरीरात लोहाची कमतरता निर्माण होऊ शकते, ज्यामुळे अशक्तपणा होऊ शकतो.
चहा कधीही रिकाम्या पोटी पिऊ नये. सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी कोमट पाणी, लिंबू पाणी किंवा कोणतेही हलके पेय प्या. पचन प्रक्रियेवर परिणाम होऊ नये म्हणून ३०-४० मिनिटांनीच चहा घ्या