Sandeep Shirguppe
जगप्रसिद्ध म्हैसूर दसऱ्याच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदा ११ दिवसांचा दसरा साजरा होणार आहे.
दरवर्षी १० दिवसांचा होणारा म्हैसूर दसरा यावेळी एका दिवसाने वाढविण्यात आला.
दरवर्षी नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवानंतर १० व्या विजयादशमीच्या दिवशी जंबोसवारीने सांगता व्हायची.
तिथींनुसार दसरा उत्सव २२ सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरदरम्यान म्हणजे ११ दिवसांसाठी आयोजित केला जाईल.
दसरा परंपरा सुरू होऊन ४१० वर्षे झाली आहेत. गेल्या ४१० वर्षांपासून दसरा १० दिवस साजरा केला जात आहे.
महाळय अमावस्येनंतर नवरात्रीपासून सुरू होते. विजयादशमीला जंबो सवारी मिरवणूक काढली जाणार आहे.
यासंदर्भात धार्मिक विचारवंत डॉ. शेलवापिल्लई अय्यंगार यांनी खासगी माध्यमांशी संवाद साधला.
शंभर वर्षांपूर्वी दसरा ११ दिवसांसाठी साजरा केला जात असावा. पण, माझ्या अनुभवात हा पहिलाच सण ११ दिवसांचा आहे.
अमावस्या २१ सप्टेंबर रोजी येते. दुसऱ्या दिवसापासून २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत शरणवरात्री आणि विजयादशमी साजरी होणार आहे.