Yashwant Kshirsagar
सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे. यात कॅल्शिअम, लोह, थायमीन, रिबोफ्लेविन, नियासिन, ‘क’ जीवनसत्त्व व ‘बी वन’ व ‘बी टू’ जीवनसत्त्व आढळतात.
आयुर्वेदानुसार सीताफळ हे शीत, मधुर रसाचे, पित्तशामक, कफकारक व तृषाशामक आहे. पण काही लोकांनी सिताफळ खाणे टाळले पाहिजे कारण आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात.
सिताफळ हे थंड प्रकृतीचे फळ आहे, त्यामुळे सर्दी-खोकला असताना ते खाल्ल्यास त्रास वाढू शकतो.
सिताफळात साखरेचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे मधुमेही रुग्णांसाठी ते हानिकारक असू शकते.
काही लोकांना सिताफळाच्या बिया किंवा फळाच्या गरावर अॅलर्जी असू शकते.
अतिप्रमाणात सिताफळ खाल्ल्याने पोटदुखी, अपचन किंवा अतिसार होऊ शकतो.
सिताफळात कॅलरीजचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते.
गर्भवती महिलांनी सिताफळ खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ज्या लोकांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांनी सिताफळ कमी प्रमाणात खावे, कारण ते पचनास जड असू शकते.