Yashwant Kshirsagar
मुघल सम्राट औरंगजेबाचा मृत्यू महाराष्ट्रातच झाला आणि त्याची कबरही इथेच आहे. पण ही कबर छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे कशी बांधली गेली? यासाठी किती खर्च आला याबाबत जाणून घेऊया.
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं आझमशाहनं ही कबर बांधली. औरंगजेब गुरू मानत असलेल्या झैनुद्दीन सिराजी यांच्या कबरीजवळच औरंगजेबाची कबर आहे.
औरंगजेबाचा मृत्यू अहमदनगरमध्ये झाला पण त्याची इच्छा होती की त्याची कबर आपल्या गुरुच्या कबरीजवळ असावी म्हणून त्याचे पार्थिव अहमदनगरवरुन खुलताबादला आणण्यात आले आणि तिथेच कबर बांधण्यात आली.
खुलताबाद हे त्याकाळी सुफी चळवळीचं केंद्र असल्यामुळे या ठिकाणी देशविदेशातून सुफी आले होते. त्या प्रत्येकाच्या कबरी खुलताबादमध्ये आहेत. त्यामुळे मृत्यूनंतर आपलंही दफन हे साधू-संतांच्या, सुफींच्या सहसावात व्हावे प्रत्येकाला वाटायचे.
औरंगजेबाच्या कबरीपाशी एका बाजूला एक शिळा ठेवण्यात आली आहे. तिच्यावर लिहिलं आहे की, औरंगजेबाचं पूर्ण नाव अब्दुल मुजफ्फर मुहिउद्दीन मोहोम्मद औरंगजेब आलमगीर आहे. औरंगजेबाचा जन्म 1618 आणि मृत्यू 1707 मध्ये झाला.
माझी जी कबर बांधाल, ती मी जे पैसे स्वत: कमावले आहेत, त्यात जितकं होईल तेवढ्यातच बांधायची आणि त्यावर एक सब्जाचं छोटंसं रोप लावण्यात यावं, इतकीचऔरंगजेबाची इच्छा होती असे जाणकार सांगतात.
इतिहास जाणकारांच्या मते, त्याकाळी ही कबर बनवण्यासाठी 14 रुपये 12 आणे इतका खर्च आला होता." आणि ही कबर औरंजेबाने कमावलेल्या पैशातूनच बांधण्यात आली.
पूर्वी या कबरीवर वरच्या बाजूला संरक्षित कवच देण्यात आलं होतं. हे कवच लाकडाचे होते.
ब्रिटिश साम्राज्यातील भारताचे व्हाईसरॉय लॉर्ड कर्झनने 1904-05 च्या दरम्यान तिथं मार्बल ग्रिल बांधून कबरीची थोडी सजावट केली.