सकाळ डिजिटल टीम
आपण अनेकदा कुलदेवता, ग्रामदेवता, क्षेत्रपाल, इष्टदेवता यांच्या पुजनाबद्दल ऐकले असेल. पण ते नेमके कोण आणि त्यांच्यातील फरक काय? हे थोडक्यात पाहू
Khandoba
Sakal
सनातन धर्मात प्रत्येक व्यक्ती, कुटुंब, गाव आणि प्रदेशाशी जोडलेले काही विशिष्ट देवता आहेत. त्याचाच कुलदेवता, ग्रामदेवता, क्षेत्रपाल, इष्टदेवता याच्याशी संबंध आहे. या देवता आपल्या कल्याणासाठी, रक्षणासाठी आणि संस्कृतीच्या जतनासाठी पुजल्या जातात.
Ganpati
Sakal
कुलदेवता किंवा कुलदेवी म्हणजे आपल्या वंशाची किंवा कुलाची रक्षण करणारी देवता. या देवतेचे पुजन पिढ्यां पिढ्या सुरू असते. कुलदेवतेच्या पुजेने घरात शांती सौख्य आणि यश प्राप्ती होते, असं मानलं जातं.
Khandoba
Sakal
कुलदेवतेची पुजा अनेकदा कुटुंबातील महत्त्वाच्या कार्यक्रमावेळी किंवा महत्त्वाच्या क्षणी, जसं की विवाहापूर्वी आणि नंतर केली जाते.
Tuljabhawani Mata
Sakal
ग्रामदेवता ही एका कुटुंबापुरती मर्यादीत नसते तर गावाची सामुहिक रक्षणकर्ता देवता असते.
Dolasnath Maharaj
Sakal
ग्रामदेवतेची पुजा सामुदायिक पद्धतीने केली जाते. यात्रा किंवा गावच्या विशेष कार्यक्रमांमध्ये ग्रामदेवतेची विशेष पुजा केली जाते.
Tambdi Jogeshwari
Sakal
क्षेत्रपाल म्हणजे एखाद्या प्रदेशाचा, भूमीचे किंवा मंदिराचे रक्षण करणारी देवता.
Bhairava
Sakal
अनेक भागांमध्ये क्षेत्रपालाला भैरव स्वरुपात पुजले जाते. हे भगवान शंकरांचे उग्र रुप असून मंदिरांच्या प्रवेशद्वालारवर पाहरेकरी म्हणूनही त्यांना स्थापिक केले जाते.
Bhairava
Sakal
इष्ट म्हणजे प्रिय अर्थात आपल्याला आवडणारी, मनाशी जोडलेली देवता म्हणजे इष्टदेवता. इष्टदेवता ही वैयक्तिक श्रद्धेचा विषय असतो.
Shree Krishna
Sakal
Why Kojagiri Punrima is Called Ashwin, Sharad and Navanna Purnima
Sakal