लाखो लोकांनी जीव गमावलेल्या भूकंपाबद्दल तुम्हाला माहितेय का?

Mansi Khambe

रशियात भूकंप

बुधवार, ३० जुलै रोजी रशियाच्या पूर्वेकडील कामचटका द्वीपकल्पात ८.८ रिश्टर स्केलच्या भूकंपाने पृथ्वीला हादरवून टाकले. १९५२ नंतरचा हा सर्वात शक्तिशाली भूकंप असल्याचे सांगण्यात येत आहे.

Russia Earthquake | ESakal

अमेरिकेलाही धक्का

या भूकंपानंतर जपानमध्ये त्सुनामी आली असून अमेरिकेतही त्सुनामीचा इशारा देण्यात आला. तसेच काही ठिकाणी उंच त्सुनामी लाटाही दिसल्या. या घटनेमुळे संपूर्ण जगभरात एकच खळबळ उडाली होती.

Russia Earthquake | ESakal

५ विनाशकारी भूकंप

फक्त रशिया आणि अमेरिकाच नाही तर अनेक देशात भूकंपाचे हादरे बसले होते. जगातील त्या पाच सर्वात मोठ्या आणि विनाशकारी भूकंपांबद्दल माहिती घ्या ज्यामुळे केवळ पृथ्वी हादरली नसून लाखो लोकांचे जीवही उद्ध्वस्त झाले होते.

5 Largest Earthquakes | ESakal

वाल्डिव्हिया, चिली

१९६० मध्ये चिलीतील वाल्डिव्हिया येथे ९.५ तीव्रता रिश्टर स्केलचा भूकंप झाला. यामुळे आलेल्या त्सुनामीने हवाई, जपान आणि फिलीपिन्समध्ये विनाश घडवून आणला. त्यात ५,७०० लोकांचा मृत्यू झाला असून लाखो लोक बेघर झाले.

Valdivia, Chile earthquake | ESakal

अलास्का, अमेरिका

१९६४ मध्ये अमेरिकेतील अलास्का येथे दुसरा सर्वात मोठा भूकंप आला. त्याची तीव्रता ९.३ होती आणि तो सतत तीन मिनिटे हादरत राहिला. यामुळे ३५ फूट उंच त्सुनामी लाटा निर्माण झाल्या. तसेच या भूकंपात १३९ लोकांचा मृत्यू झाला.

Alaska, USA Earthquake | ESakal

सुमात्रा, इंडोनेशिया

२००४ साली इंडोनेशियातील सुमात्रा येथे ९.१ तीव्रतेचा भूकंप आला. ज्यामुळे अनेक देशांमध्ये त्सुनामी आली असून या नैसर्गिक आपत्तीत २.२८ लाख लोक मृत्युमुखी पडले.

Sumatra, Indonesia earthquake | ESakal

टोहोकू, जपान

२०११ मध्ये जपानमधील टोहोकू येथे भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता ९.१ होती. या विनाशात सुमारे १९,७५० लोकांचा मृत्यू झाला. तर १ लाखाहून अधिक लोकांना आपले घर सोडून दुसऱ्या ठिकाणी जावे लागले.

Tohoku, Japan Earthquake | ESakal

कामचटका, रशिया

१९५२ मध्ये रशियातील कामचटका येथे पाचवा भूकंप आला. त्याची तीव्रता ९.० होती. हा जगातील पहिला ९.० तीव्रतेचा भूकंप होता. या काळात त्सुनामी आली आणि कोट्यवधी रुपयांची मालमत्ता नष्ट झाली.

Kamchatka, Russia Earthquake | ESakal

सभागृहाचे कामकाज स्थगित झाल्यावर खासदार काय करतात?

Parliament Monsoon Session | ESakal
येथे क्लिक करा