वन्यजीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान यामध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...

Mansi Khambe

वन्यजीव संरक्षित क्षेत्रे

वन्यजीव आणि जंगलांचे संरक्षण करण्यासाठी देशात अनेक संरक्षित क्षेत्रे तयार करण्यात आली आहेत. राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्ये उभारण्यात आली आहेत.

Wildlife Sanctuary & National Park Difference

|

ESakal

फरक

बरेच लोक या दोन्ही क्षेत्रांना एकच समजतात. मात्र या दोन्ही क्षेत्रांच्या कार्यांमध्ये आणि नियमांमध्ये महत्त्वपूर्ण फरक आहे. याबाबत जाणून घ्या.

Wildlife Sanctuary & National Park Difference

|

ESakal

वन्यजीव अभयारण्य

वन्यजीव अभयारण्य हे एक संरक्षित वनक्षेत्र आहे, जिथे प्राणी आणि पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक वातावरणात संरक्षण दिले जाते. त्यांची शिकार करण्यास किंवा त्यांना इजा पोहोचवण्यास सक्त मनाई आहे.

Wildlife Sanctuary & National Park Difference

|

ESakal

वन्यजीवांचे संरक्षण

सध्या भारतात ५६७ वन्यजीव अभयारण्ये आहेत. वन्यजीव अभयारण्य वन्यजीवांचे संरक्षण करणे हा मुख्य उद्देश आहे. लोकांना काही विशिष्ट अटींनुसार या क्षेत्रांना भेट देण्याची परवानगी दिली जाते.

Wildlife Sanctuary & National Park Difference

|

ESakal

पर्यावरणाचे संरक्षण

दुसरीकडे, राष्ट्रीय उद्यानाची व्याप्ती अधिक मोठी असते. ते केवळ प्राण्यांचेच नव्हे, तर संपूर्ण जंगल, वनस्पती, जमीन आणि नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण करते.

Wildlife Sanctuary & National Park Difference

|

ESakal

कठोर नियम

राष्ट्रीय उद्यानांमध्ये अधिक कठोर नियम असतात, जे लोकांच्या हालचालींवर निर्बंध घालतात. शिवाय, अनेक ठिकाणी परवानगीशिवाय प्रवेश करण्यास मनाई असते. भारतात सध्या एकूण १०६ राष्ट्रीय उद्याने आहेत.

Wildlife Sanctuary & National Park Difference

|

ESakal

नैसर्गिक स्थितीचे जतन

वन्यजीव अभयारण्यांमध्ये मर्यादित मानवी क्रियाकलापांना परवानगी दिली जाऊ शकते, तर राष्ट्रीय उद्यानांमध्ये अधिक कठोर नियम असतात, जे जंगलाच्या नैसर्गिक स्थितीचे जतन सुनिश्चित करतात.

Wildlife Sanctuary & National Park Difference

|

ESakal

संवर्धन

वन्यजीव अभयारण्ये विशिष्ट प्राणी प्रजातींच्या संवर्धनावर अधिक लक्ष केंद्रित करतात. तर राष्ट्रीय उद्याने संपूर्ण परिसंस्थेचे जंगलाच्या प्रत्येक भागाचे संरक्षण करण्यासाठी कार्य करतात.

Wildlife Sanctuary & National Park Difference

|

ESakal

IUCN

इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचरने (IUCN) वन्यजीव अभयारण्यांना चौथ्या श्रेणीत, तर राष्ट्रीय उद्यानांना दुसऱ्या श्रेणीत वर्गीकृत केले आहे. म्हणजेच राष्ट्रीय उद्यानांमधील संरक्षण आणि नियम अधिक कठोर असतात.

Wildlife Sanctuary & National Park Difference

|

ESakal

सुरक्षा

वेगाने कमी होणारी जंगले आणि वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर, ही ठिकाणे प्राण्यांसाठी सुरक्षित घरे म्हणून काम करतात आणि लोकांना निसर्गाच्या जवळ जाण्याची व वन्यजीवांना समजून घेण्याची संधी देतात.

Wildlife Sanctuary & National Park Difference

|

ESakal

मुंबईजवळ सापडली १५०० वर्षे जुनी उद्योगनगरी; संशोधकही अचंबित, पाहा दुर्मिळ फोटो

Elephanta Caves Ancient Industrial City

|

ESakal

येथे क्लिक करा