मुंबईजवळ सापडली १५०० वर्षे जुनी उद्योगनगरी; संशोधकही अचंबित, पाहा दुर्मिळ फोटो

Mansi Khambe

एलिफंटा बेट

मुंबईच्या किनाऱ्यापासून जवळच असलेल्या जागतिक वारसास्थळाचा दर्जा असणाऱ्या एलिफंटा बेटावर (घारापुरी) इतिहासाचा एक अनमोल ठेवा उघडकीस आला आहे.

Elephanta Caves Ancient Industrial City

|

ESakal

उद्योगनगरी

मागील चार महिन्यांपासून एलिफंटा बेटावर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून उत्खनन सुरु होते. यावेळी दगड आणि विटांनी बांधलेले १,५०० वर्षांहून अधिक जुनी असणारी उद्योगनगरी सापडली आहे.

Elephanta Caves Ancient Industrial City

|

ESakal

इराणचे पुरावे

इतकेच नव्हे तर इराणमधील प्राचीन भांड्याचे अवशेष देखील सापडले आहेत. तसेच पाणी साठवण यंत्रणा, पाण्याचा पुनर्वापर करणारी यंत्रणा, मण्यांच्या माळा सापडल्या आहेत. हे भारत-इराण यांच्यातील संबंधाचे ठसठशीत पुरावे असल्याचे दिसून येत आहे.

Elephanta Caves Ancient Industrial City

|

ESakal

प्राचीन जलव्यवस्थापना

एलिफंटा बेटावरील या शोधामुळे बेटावरील प्राचीन जलव्यवस्थापन पद्धती समोर येत आहे. उत्खननात २० पायऱ्या आढळून आल्या असून दगडांच्या ठोकळ्यांपासून बांधल्याची रचना आहे.

Elephanta Caves Ancient Industrial City

|

ESakal

ट्रकाइट दगड

या पायऱ्या एलिफंटा बेटावरील दगडांऐवजी बाहेरून आणलेल्या दगडांनी बांधल्या आहेत. हा दगड ट्रकाइट जातीचा असावा, असा निष्कर्ष लावला जात आहे.

Elephanta Caves Ancient Industrial City

|

ESakal

तुलना

या वास्तूची तुलना गुजरात आणि राजस्थानमध्ये आढळणाऱ्या 'पायऱ्यांच्या विहिरीं'शी केली जात आहे. अशा विहिरी जिथे पायऱ्या उतरून गेल्यावर मध्यभागी असणाऱ्या मुख्य जलाशयापर्यंत पोहोचता येते. या रचनेचा उगम सातव्या शतकात झाला असावा, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Elephanta Caves Ancient Industrial City

|

ESakal

खोदकामात काय सापडले?

तपकिरी रंगाचे मोठे हौद, मातीच्या विटांनी बांधलेली गोदामे (वेअर हाऊस), निवासी संकुले, जहाजांवर लक्ष ठेवणारे टॉवर, स्टोन ज्वेलरी (दगडी मण्यांचे कारखाने)

Elephanta Caves Ancient Industrial City

|

ESakal

कसा आहे प्राचीन जलसाठा?

ASIच्या माहितीनुसार, आतापर्यंत 5 मीटर खोलीपर्यंत उत्खनन करण्यात आले आहे. हा जलसाठा साधारण 14.7 मीटर लांब असून त्याची रुंदी 6.7 मीटर ते 10.8 मीटर दरम्यान आहे.

Elephanta Caves Ancient Industrial City

|

ESakal

ऐतिहासिक पाऊलखुणा

या पुरातन, दुर्मीळ वस्तू व संशोधनामुळे बेटावरील ऐतिहासिक पाऊलखुणा प्रकाशात येणार असल्याची माहिती भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधीक्षक पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. अभिजीत आंबेकर यांनी दिली.

Elephanta Caves Ancient Industrial City

|

ESakal

रेल्वे रुळांवर डावीकडे जावे की उजवीकडे? हे लोको पायलटला कसं कळतं? जाणून घ्या...

Railway signaling system

|

ESakal

येथे क्लिक करा