शरीरात हार्मोन्सचं असंतुलन का होतं? अन् त्यावर उपया काय आहेत?

रोहित कणसे

तारुण्यात पदार्पण करतेवेळी मासिक पाळी सुरू होताना, गरोदरपणात नंतर मेनोपॉज, वृद्धपकाळ अशा टप्प्यांवर शरीरातील हॉर्मोन्सचे असंतुलन वाढत असल्याचे दिसून येते.

know what is hormonal imbalance its cause and treatment Marathi health news

अलीकडे विविध वयोगटाच्या लोकांमध्ये शरीरातील हार्मोन्स असंतुलनाच्या तक्रारी वाढत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.

know what is hormonal imbalance its cause and treatment Marathi health news

याला बदललेली जीवनशैली कारणीभूत आहे. यामुळेच हॉर्मोन्सवर परिणाम होतो आणि अनेक जुनाट रोग जडतात.

know what is hormonal imbalance its cause and treatment Marathi health news

शरीरातील हार्मोन्सच्या बदलाने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात.

know what is hormonal imbalance its cause and treatment Marathi health news

एन्डोक्राईन ग्लॅंड्समध्ये स्रवणारे रसायन म्हणजे हार्मोन्स. शरीरातील महत्त्वाच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यामध्ये या ग्रंथी महत्त्वाची भूमिका बजावतात.

know what is hormonal imbalance its cause and treatment Marathi health news

चयापचय क्रिया, वाढ, पुनर्निर्मिती, लैंगिक आरोग्य, मूड्स, त्वचा आणि केसांचे आरोग्य आणि अगदी झोपेसारख्या महत्त्वाच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यास या ५० पेक्षा जास्त ग्लँड्स म्हणजे ग्रंथी मदत करतात.

know what is hormonal imbalance its cause and treatment Marathi health news

शरीरातील हॉर्मोन्सचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त झाले तर हॉर्मोन्समध्ये असंतुलन असल्याचे समजले जाते.

know what is hormonal imbalance its cause and treatment Marathi health news

हार्मोन्सचे असंतुलन वाढण्याची कारणे ही ताण, जास्त काळ एका जागी बसून काम करणे, चरबीयुक्त पदार्थ खाणे, अपूर्ण झोप ही आहेत.

know what is hormonal imbalance its cause and treatment Marathi health news

हार्मोन्सच्या असंतुलनाचे परिणामांबद्दल बोलायचे झाले तर यामुळे थायरॉईड, पीसीओडी, मधुमेह, वंध्यत्व इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

know what is hormonal imbalance its cause and treatment Marathi health news

अचानकपणे वजनात वाढणे किंवा कमी होणे, थकवा जाणवणे, बधिरपणाचा भास होणे, हातापायांना मुंग्या येणे, कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त वाढणे, नैराश्य किंवा अस्वस्थपणा यांसारख्या मानसिक समस्या जाणवणे ही हार्मोन्स असंतुलनाची लक्षणे आहेत.

know what is hormonal imbalance its cause and treatment Marathi health news

यावर उपाय म्हणून रिकाम्या पोटी कॉफी पिणे टाळा, जेवणाच्या ठराविक वेळा पाळा, ताण न बाळगता मन शांत ठेवावे, पुरेशी झोप घ्यावी, बैठे काम जास्तवेळ करू नका, प्लास्टिक, ॲल्युमिनिअम, नॉनस्टिक भांड्यांचा वापर करू नका असा सल्ला तज्ज्ञ देतात.

know what is hormonal imbalance its cause and treatment Marathi health news

अनुष्का शेट्टीबद्दल 'हे' माहिती आहे का?