पिवळा, नारंगी नाही तर..., सूर्याचा रंग कोणता? ९९ टक्के लोकांना उत्तर माहित नाही

Mansi Khambe

सूर्याचा रंग

लहानपणापासून सर्वांना सूर्याचा रंग सोनेरी पिवळा किंवा तेजस्वी नारंगी असल्याची माहिती आहे. परंतु वैज्ञानिक तपासणीतून हे रंग पूर्णपणे चुकीचे असल्याचे समोर आले आहे.

Sun Color

|

ESakal

पांढरा सूर्य

अवकाशाच्या खोलवरच्या भागातून पाहिल्यास सूर्य पिवळ्या गोलासारखा नव्हे, तर दुधासारखा पांढरा आणि चमकदार असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.

Sun Color

|

ESakal

पृथ्वीवरील वातावरण

रंगांचा हा संपूर्ण खेळ आपल्या पृथ्वीच्या वातावरणावर आणि प्रकाश प्रक्रियेवर अवलंबून असतो.

Sun Color

|

ESakal

इंद्रधनुष्य

सूर्यापासून निघणारा प्रकाश एक जटिल मिश्रण आहे, ज्यामध्ये इंद्रधनुष्याचे सातही रंग असतात. जेव्हा हे सर्व रंग एकत्र येतात, तेव्हा हा प्रकाश आपल्या डोळ्यांना पांढरा दिसतो.

Sun Color

|

ESakal

चंद्राची छाया

याच कारणामुळे, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक किंवा चंद्रावरून घेतलेल्या छायाचित्रांमध्ये सूर्य पूर्णपणे पांढरा दिसतो. कारण तिथे पृथ्वीसारखे वातावरण नसल्यामुळे प्रकाश त्याच्या मूळ स्वरूपातच राहतो.

Sun Color

|

ESakal

वायू

सूर्य पिवळा किंवा नारंगी दिसण्याचे कारण म्हणजे पृथ्वीभोवती असलेले वायू आणि धुळीच्या कणांचे आवरण.

Sun Color

|

ESakal

सूर्यप्रकाश

सूर्यप्रकाश पृथ्वीवरील वातावरणात प्रवेश करतो, तेव्हा तो हवेतील कणांशी टक्कर देतो. ज्यामुळे आकाश निळे दिसते आणि उरलेला सूर्यप्रकाश फिकट पिवळा दिसतो.

Sun Color

|

ESakal

लाल रंग

तसेच सकाळ आणि संध्याकाळी सूर्य क्षितिजाच्या जवळ असतो, ज्यामुळे सूर्याचा रंग गडद नारंगी किंवा लाल दिसून येतो. यावेळी सूर्यप्रकाशाला आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी वातावरणातून अधिक अंतर कापावे लागते.

Sun Color

|

ESakal

लालसर छटा

सूर्यप्रकाशाच्या या प्रक्रियेदरम्यान लाल आणि नारंगी रंगांच्या जास्त तरंगलांबीचे रंग आपल्यापर्यंत पोहोचतात, ज्यामुळे मावळत्या सूर्याला लालसर छटा येते.

Sun Color

|

ESakal

ब्रेडचे पहिले आणि शेवटचे तुकडे वेगवेगळे का असतात? जाणून घ्या मागील रंजक कारण...

Bread Slice

|

ESakal

येथे क्लिक करा