Mansi Khambe
१ ऑगस्ट रोजी, १९-किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात २०० रुपयांपेक्षा जास्त घट झाली आहे. मात्र, १४.२-किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत मात्र स्थिर आहे.
LPG Gas Price
ESakal
देशभरात मोठ्या संख्येने लोक एलपीजी सिलेंडर वापरतात. तर हॉटेल्स, ढाबे, कॅफे आणि रेस्टॉरंट्स यांसारख्या ठिकाणी स्वयंपाक आणि व्यावसायिक कामांसाठी व्यावसायिक सिलेंडर वापरले जातात.
LPG Gas Price
ESakal
दोन्ही सिलेंडरमध्ये सारखाच एलपीजी गॅस असूनही, १९-किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडर आणि १४.२-किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात फरक का आहे? यामागे काय कारण आहे? याचे कारण जाणून घ्या.
LPG Gas Price
ESakal
सरकार आर्थिक घटकांचा विचार करून घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत ठरवते. शिवाय, सरकार पात्र ग्राहकांना गॅस अनुदान देते, ज्यामुळे घरगुती सिलेंडरची किंमत व्यावसायिक सिलेंडरपेक्षा कमी राहते.
LPG Gas Price
ESakal
सरकार व्यावसायिक एलपीजी सिलेंडरवर कोणतेही अनुदान देत नाही. या सिलेंडरची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारातील एलपीजीच्या दरावर आधारित ठरवली जाते. यामुळे त्याचा दर वाढू किंवा कमी होऊ शकतो.
LPG Gas Price
ESakal
व्यावसायिक सिलेंडर घरगुती कामांसाठी वापरले जात नाहीत. शिवाय, लागू होणारे कर, वितरण खर्च आणि इतर व्यावसायिक खर्च घरगुती सिलेंडरपेक्षा वेगळे असतात, म्हणूनच दोन्ही सिलेंडरच्या किमतीत फरक दिसून येतो.
LPG Gas Price
ESakal
दोन्ही सिलेंडरचे वजन वेगळे असते. घरगुती एलपीजी सिलेंडरमध्ये १४.२ किलोग्रॅम गॅस असतो, तर व्यावसायिक सिलेंडरमध्ये १९ किलोग्रॅम गॅस असतो. या फरकामुळे त्यांच्या किंमतीतही फरक पडतो.
LPG Gas Price
ESakal
World's Fastest Freight Train
ESakal