लोखंडाचा असूनही रेल्वे ट्रॅकला गंज का लागत नाही?

Mansi Khambe

ट्रेनमध्ये प्रवास

आपण सर्वांनी कधी ना कधी ट्रेनमध्ये प्रवास केला असेल. प्रवास करताना, तुम्ही रेल्वे ट्रॅकचे बारकाईने निरीक्षण केले असेल. आपण सर्वजण प्रवासादरम्यान हे करतो.

Railway Track

|

ESakal

रेल्वे ट्रॅक

तुम्ही रेल्वे ट्रॅक पाहिले असतील पण तुम्ही कधी विचार केला आहे का की लोखंडाचे बनलेले असूनही ट्रॅक का गंजत नाहीत? आपल्या घरात असलेले नवीन लोखंड काही दिवसांतच गंजते.

Railway Track

|

ESakal

लोखंड गंजतं

जर ते उघड्यावर ठेवले तर ते खूप लवकर गंजू लागते. २४ तास उघड्यावर ठेवल्यानंतरही रेल्वे ट्रॅक का गंजत नाहीत? शेवटी, रेल्वे ट्रॅक कोणत्या प्रकारच्या साहित्यापासून बनवले जातात?

Railway Track

|

ESakal

लोखंडाचे शत्रू

पाणी आणि हवा हे लोखंडाचे शत्रू आहेत. परंतु रेल्वे रुळांवर सतत त्यांचा प्रभाव असतो. तरीही ते कधीही गंजत नाहीत किंवा कमकुवत होत नाहीत.

Railway Track

|

ESakal

वरचा भाग चमकदार

रुळांच्या कडेला गंज येऊ शकतो. परंतु वरचा भाग चमकदार राहतो. लोखंडी वस्तू हवेतील ऑक्सिजनशी प्रतिक्रिया देतात तेव्हा त्यांना गंज येतो.

Railway Track

|

ESakal

ऑक्साईडचा तपकिरी थर

या अभिक्रियेमुळे लोह ऑक्साईडचा तपकिरी थर तयार होतो. लोखंडावरील गंज नेहमीच थरांमध्ये वाढतो, परंतु रेल्वे ट्रॅकच्या बाबतीत असे होत नाही.

Railway Track

|

ESakal

मॅंगनीज स्टील

अनेकांना असे वाटते की रेल्वे ट्रॅक लोखंडाचे बनलेले असतात, परंतु ते खरे नाही. रेल्वे ट्रॅक मॅंगनीज स्टील नावाच्या एका विशेष प्रकारच्या स्टीलपासून बनवले जातात.

Railway Track

|

ESakal

पदार्थ

त्यात १२ टक्के मॅंगनीज आणि ०.८ टक्के कार्बन असते. हे पदार्थ ट्रॅकच्या वरच्या भागात आयन ऑक्साईड थर तयार होण्यास प्रतिबंध करते.

Railway Track

|

ESakal

१०रुपयांच्या नाण्याचा बाहेरील भाग पिवळा का असतो? तो कोणत्या धातूपासून बनवतात?

10rs Coin

|

ESakal

येथे क्लिक करा