सकाळ डिजिटल टीम
जेव्हा-जेव्हा बुद्धिमान प्राण्यांचा विचार केला जातो, तेव्हा कोल्ह्याचं नाव सर्वात आधी येतं.
मात्र, शास्त्रज्ञांच्या दृष्टीने ते तितके बुद्धिमान नाहीत.
अशा परिस्थितीत, मानवांनंतर सर्वात बुद्धिमान कोण आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
विज्ञानानं आधीच सिद्ध केलंय, की चिंपांझी आणि मानवांमध्ये 94 टक्के DNA सामायिक आहे.
चिंपांझी ही अशी प्रजाती आहे, जी मानवांप्रमाणेच त्यांच्या साथीदारांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करते.
मानवांनंतर सर्वात जास्त बुद्धिमत्ता असलेल्या प्राण्यांमध्ये डॉल्फिन आणि ऑक्टोपस यांचाही समावेश होतो.
हत्ती हा सर्वात मोठा मेंदू असलेला प्राणी आहे, त्याचा मेंदू मानवी मेंदूपेक्षा सुमारे 3 पट मोठा असतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.