सकाळ डिजिटल टीम
कोहळा हा अनेक आजारांसाठी फायदेशीर मानला जातो.
कोहळा खाण्याचे आरोग्यदायी फायेदे कोणते आहेत जाणून घ्या.
कोहळा शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ओळखला जातो, ज्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात त्याचा आहारात समावेश करणे फायदेशीर मानले जाते.
कोहळ्यामध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठते पासून आराम मिळण्यास मदत होते.
कोहळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि इतर पोषक तत्वे असल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.
कोहळा कमी कॅलरी आणि उच्च फायबर सामग्रीमुळे वजन कमी करण्यासाठी एक चांगला पर्याय मानला जातो.
कोहळा मानसिक ताण कमी करण्यास आणि शांत झोप लागण्यास मदत करतो, त्यामुळे तणावग्रस्त लोकांसाठी एक चांगला आहार आहे.
कोहळ्याचा रस प्यायल्याने पोटाच्या समस्या कमी होण्यास मदत मिळते.
कोहळा खाताना तो चांगला पिकलेला आणि स्वच्छ असावा. कोहळ्याचा रस काढताना तो गाळून घ्यावा, ज्यामुळे फायबर आणि पोषक तत्वे टिकून राहतील.