Aarti Badade
जास्त साखर शरीरात चरबीच्या स्वरूपात साठते, विशेषतः पोटाभोवती. यामुळे लठ्ठपणा वाढतो आणि शरीराचा आकार बिघडतो.
साखर वाईट बॅक्टेरियांना पोसते, ज्यामुळे पचन बिघडते, गॅस आणि फुगवट्याचा त्रास होतो.
रात्री साखर खाल्ल्याने झोप नियंत्रित करणाऱ्या हार्मोन्सवर परिणाम होतो, ज्यामुळे पुरेशी झोप लागत नाही.
साखरेच्या पातळीत चढ-उतार झाल्यास मूडवर परिणाम होतो. चिडचिडेपणा आणि मानसिक अस्थिरता जाणवते.
साखर खाल्ल्यामुळे पुन्हा पुन्हा गोड खाण्याची इच्छा निर्माण होते, विशेषतः महिलांमध्ये मासिक पाळीपूर्वी.
कधी खूप उत्साह, तर कधी प्रचंड थकवा — हे साखरेमुळे रक्तातील ग्लुकोज असंतुलनाचे लक्षण असू शकते.
साखरेमुळे आतड्यांतील चांगले बॅक्टेरिया मरतात आणि वाईट बॅक्टेरिया वाढतात, ज्यामुळे पचन, त्वचा आणि प्रतिकारशक्तीवर परिणाम होतो.