Monika Shinde
यंदा कोजागिरी पौर्णिमा ६ की ७ ऑक्टोबर आहे का? जाणून घ्या 2025 मधील खरी तारीख, शुभ मुहूर्त आणि त्याचा महत्त्वाचा धार्मिक अर्थ.
कोजागिरी म्हणजे ‘को जागर्ति?’ म्हणजे ‘कोण जागा आहे?’ अशी एक प्राचीन श्रद्धा आहे, ज्यामध्ये लक्ष्मी माता जागर करीत असतात.
2025 मध्ये पौर्णिमा तिथी ६ ऑक्टोबर दुपारी १२:२४ पासून सुरू होऊन ७ ऑक्टोबर सकाळी ९:१८ पर्यंत राहील.
शास्त्रानुसार, पूर्णिमा संध्याकाळी सुरू झाल्याने कोजागिरी पौर्णिमेचा व्रत ६ ऑक्टोबर रोजीच करावा.
या दिवशी महालक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. लक्ष्मी मंत्रांचा जप, दीपदान आणि भक्तिगीतांचा संग लागतो.
चंद्रप्रकाशात दूध किंवा खीर ठेवण्याची परंपरा आहे. मानतात की चंद्रकिरणे त्याला अमृततुल्य बनवतात.
कोजागिरी पौर्णिमेची रात्र जागरणासाठी प्रसिद्ध आहे. भक्तगण रात्री जागून लक्ष्मी पूजा करतात आणि मनोकामना पूर्ण होण्याची प्रार्थना करतात.
या दिवशी केलेली पूजा आणि मंत्रजप आपल्या घरात सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येतो. कोजागिरी पौर्णिमेचा महिमा अमूल्य आहे.