राइट बंधूंच्या आधी कोल्हापुरात १८९४ला झालेलं विमान उड्डाण, तेव्हा किती खर्च आलेला? नोंदीतून मोठा खुलासा

सूरज यादव

विमान सेवा

अधिकृत विमान सेवा १९०३ मध्ये राइट बंधूंनी सुरू केली. पण त्याआधी भारतात विमान उडवण्यात आलं असल्याची कागदपत्रं आता समोर आली आहेत.

Plane history

|

Esakal

मुंबईत १८९५ला

भारतात १८९५ मध्ये शिवकर बापूजी तळपदे यांनी मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यावर विमान उडवलं होतं. मात्र याची नोंद जागतिक स्तरावर होऊ शकली नव्हती.

Plane history

|

Esakal

तंत्रात बदल

अमेरिकेत १७ डिसेंबर १९०३ रोजी किटी हॉक इथं द फ्लायर नावाच्या विमानाचं उड्डाण राइट बंधूंनी केलं. त्यानंतर आतापर्यंत विमान उड्डाणाच्या तंत्रात अनेक बदल झाले.

Plane history

|

Esakal

कोल्हापुरात १८९४ला

१८९४ मध्ये कोल्हापुरात विमान उड्डाणाचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं होतं. मानसिंगराव कुमठेकर यांनी शोध संशोधन केलेय. याची नोंद मिरज संशोधन मंडळातील कुमठेकर संग्रहात आढळून आलीय.

Plane history

|

Esakal

मिरज संस्थानात नोंद

मिरज संस्थानचे तत्कालीन राजे गंगाधरराव पटवर्धन यांच्या रोजकिर्दीतील नोंदीनुसार ६ आणि ८ डिसेंबर १८९४ रोजी कोल्हापुरात विमान उडवण्याचा समारंभ झाला.

Plane history

|

Esakal

किती खर्च

विमान उडवण्याच्या समारंभासाठी त्यावेळी १३२ रुपये १२ आणे खर्च झाले. तर १० रुपये विमान उडवणाऱ्या अमेरिकन व्यक्तीला दिले होते.

Plane history

|

Esakal

वैमानिकाला बक्षीस

कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या आश्रयाखाली हे ऐतिहासिक उड्डाण झालं होतं. मिरजेचे राजे गंगाधरराव पटवर्धन यांनी अमेरिकन व्यक्तीला १०० रुपये बक्षीसही दिलं होतं.

Plane history

|

Esakal

भारतात कधी?

भारतात कोलकात्यात १९१० मध्ये विमानसेवा सुरू झाली होती. तर कोल्हापुरात १९३९ ला विमानसेवा सुरू झाली. त्याआधी १९२७ ला औंधच्या युवराजांनी त्यांचं छोटं विमान कोल्हापुरात उतरवलं होतं.

Plane history

|

Esakal

महाराष्ट्रात टिपू सुलतानची सत्ता कुठे कुठे पसरली होती? वाचा सत्तेचा नकाशा

Tipu Sultan

|

ESakal

इथं क्लिक करा