संतोष कानडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या निर्वाणानंतर स्वराज्याच्या दोन गाद्या निर्माण झाल्या. एक सातारा आणि दुसरी कोल्हापूर.
कोल्हापूर संस्थानच्या छत्रपतींच्या देवघराचे हे फोटो आहेत. यातील देव शेकडो वर्षे जुने आहेत.
कोल्हापुरातल्या जुन्या राजवाड्यातील भवानी मंडप येथे हे देवघर आहे. छत्रपती कुटुंब नवीन वाड्यात वास्तव्याला आहे.
छत्रपती शाहू महाराजांनी सर्व कोल्हापूरकरांसाठी आणि शिवप्रेमींसाठी हे देवघर खुले केलेले होते.
छत्रपतींच्या या देवघरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताचा चांदीचा पंजा आहे. हा पंजा सिंधुदुर्ग किल्ल्यातील हातांच्या ठशांवरुन शाहू महाराजांनी तयार करुन घेतला होता.
भोसले घराण्यातील अनेक पूर्वजांच्या पादुका देवघरात आहेत. शिवाय शिवराय ते ताराराणी महाराजसाहेबांच्या मूर्ती आहेत.
तसेच आई तुळजाभवानी, महादेवाची पिंड, दत्ताची मूर्ती देवघरामध्ये आहे. सर्व देवांची नित्यनियमाने पूजा होते.
सर्व जनतेसाठी हे देवघर खुलं आहे. रोज हजारो भाविक कोल्हापुरातल्या भवानी मंडपात देवदर्शन घेतात.
संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिता राजे यांनी देवघराचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी शेअर केला होता.