पुणे जिल्ह्यातला सर्वात सुंदर आणि स्वस्त टुरिस्ट स्पॉट कोणता?

संतोष कानडे

पुण्यापासून जवळ

तुम्हाला पुण्यापासून जवळ कुठेतरी फिरायला जायचं असेल तर हा पर्यात सर्वोत्तम आहे.

ताम्हिणी घाट

पुण्यापासून ७० ते ८० किलोमीटर अंतरावर आहे ताम्हिणी घाट. हा घाट मुळशी तालुक्यात सुरु होतो आणि रायगड जिल्ह्यात पोहोचतो.

महाबळेश्वर

ताम्हिणी घाट म्हणजे मिनी महाबळेश्वर. येथे डोंगरावरुन कोसळणारे शेकडो धबधबे आहेत.

मुळशी धरण

घाटाच्या सुरुवातीलाच मुळशी धरणाचे अफाट बॅकवॉटर नजरेस पडते. हे खूपच सुंदर आणि शांत आहे.

दरी

घाटामध्ये एका स्पॉटवरुन दरीचा आकार बेरजेच्या चिन्हासारखा दिसतो. याच या ठिकाणचं पर्यटकांना मुख्य आकर्षण आहे.

पर्यटक

जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये पर्यटकांची येथे मोठी गर्दी असते. हिवाळ्यात थेट जानेवारीपर्यंत लोक येथे आनंद घेण्यासाठी जातात.

इंधन

फक्त जाण्याचा खर्च आहे. इंधन किंवा तिकिटाचा किरकोळ खर्च सोडला तर तिथे खाण्यासाठी थोडेफारच पैसे लागू शकतात.

हॉटेल्स

घाटात चांगले हॉटेल्स तसे नाहीत. पण काही स्टॉल्स आणि छोटी हॉटेल्स तुमची भूक भागवू शकतात. येथे मोबाईल नेटवर्कची समस्या आहे.

धुकं

पावसाळ्यामध्ये धुक्यामुळे अजिबात रस्ता दिसत नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या वेळी किंवा हिवाळ्यात सकाळच्या वेळी सावधगिरीने गाडी चालवावी.

महाराष्ट्रातले सर्वात स्वस्त पाच टुरिस्ट स्पॉट

<strong>येथे क्लिक करा</strong>