Vinod Dengale
कोल्हापूरचा इतिहासाची मुळे ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यापासून सुरू होतात.
Maharani Tararani
पण करवीर राज्य संस्थापिका हे महाराणी ताराराणी साहेबांना म्हटलं जातं.
छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर मराठा गादी कायम राहावी यासाठी ताराराणी यांनी सतत प्रयत्न केले.
ताराराणींना मुघलांविरुद्ध केलेल्या त्यांच्या पराक्रमामुळे “मोगल मर्दिनी” म्हणून ओळखलं जातं.
1707 साली औरंगजेबाच्या मृत्यू नंतर छ. संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराजांची सुटका झाली आणि मराठा साम्राज्यात सत्तासंघर्ष निर्माण झाला.
1708 साली शाहू महाराजांची साताऱ्यात सत्ता स्थापन झाली आणि त्यांनी राज्याभिषेक केला.
त्यानंतर ताराराणी यांनी पन्हाळा, विशाळगड पुन्हा जिंकून घेतले आणि 1710 साली करवीर (कोल्हापूर) हे स्वतंत्र राज्य स्थापन केले.
पन्हाळ्यावर त्यांनी आपले पुत्र शिवाजी (दुसरे) यांना गादीवर बसवून कारभार सुरू केला.
Shahu Maharaj era governance Konkan history
esakal