Sandeep Shirguppe
भारत आणि ब्रिटन यांच्यातील ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावर (एफटीए) शिक्कामोर्तब झाला.
कोल्हापुरी चप्पल आणि चामडी बॅगांसारख्या उत्पादनांना शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे.
यामुळे हस्तकारागिरी असलेल्या आणि चर्मकार समूहातील कुटुंबांना चांगले दिवस येणार आहेत.
याबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी त्यांच्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये केला आहे.
या निर्णयामुळे स्थानिक आणि कुटुंब आधारित उत्पादनांनाच चालना मिळणार आहे.
तसेच स्थानिकांच्या ब्रॅंडची ओळख वाढण्यास, सांस्कृतिक ओळख जपण्यास आणि शाश्वत वस्तूंच्या निर्यातीला पाठिंबा देण्यास मदत होईल.
कोल्हापुरी चप्पलशिवाय वाराणसीच्या लूम्स, हैदराबादमधील डिजिटल लॅबलाही फायदा होणार आहे.
आणि राजस्थानमधील कारागीर क्लस्टर्सना देखील यूकेसोबतच्या कराराचा फायदा होणार आहे गोयल म्हणाले.