हृदयासाठी हवयं ओमेगा-३? मग खा 'हे' व्हेज पदार्थ!

Aarti Badade

ओमेगा-३ चे फायदे

ओमेगा-३ फॅटी अॅसिड हृदय, मेंदू व त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. यामुळे सूज कमी होते आणि एकंदर आरोग्य सुधारते.

omega-3 vegetarian sources | Sakal

मासे न खाता मिळवा ओमेगा-३

बहुतेकांना वाटते ओमेगा-३ फक्त माशांमध्ये असते, पण हे अनेक शाकाहारी घटकांमध्येही मुबलक प्रमाणात आढळते.

omega-3 vegetarian sources | Sakal

चिया बिया

छोट्या पण शक्तिशाली चिया बियांमध्ये प्रति चमच्याला सुमारे ५ ग्रॅम ओमेगा-३ असते. फायबर, प्रथिने व कॅल्शियमही असते.

omega-3 vegetarian sources | Sakal

अळशी (जवस) बिया

१ टेबलस्पून दळलेल्या अळशी बियांमध्ये सुमारे २.५ ग्रॅम ओमेगा-३. बिया दळून खाल्ल्यास जास्त फायदा होतो.

omega-3 vegetarian sources | Sakal

अक्रोड

मूठभर अक्रोडमध्ये २.५ ग्रॅम ओमेगा-३. यामध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात.

omega-3 vegetarian sources | Sakal

सोयाबीन आणि त्याचे पदार्थ

टोफू, एडामामे आणि टेम्पेह हे देखील ओमेगा-३ चे समृद्ध स्रोत आहेत. एका कप शिजवलेल्या सोयाबीनमध्ये सुमारे १.२ ग्रॅम ओमेगा-३ असतो.

omega-3 vegetarian sources | Sakal

राजमा

शिजवलेल्या राजमामध्ये ०.१ ग्रॅम ओमेगा-३, शिवाय फायबर, प्रथिने व फोलेटही असते.

omega-3 vegetarian sources | Sakal

निष्कर्ष

शाकाहारी असलात तरी चिंता नको! या पदार्थांच्या नियमित सेवनाने तुमच्या शरीराला पुरेसा ओमेगा-३ मिळू शकतो.

omega-3 vegetarian sources | Sakal

चहा-बिस्किटांची जोडी आरोग्याला घातक का? जाणून घ्या!

Side effects of having tea and biscuits on an empty stomach | Sakal
येथे क्लिक करा