Saisimran Ghashi
अनेक लोक ट्रीपसाठी इटलीला जातात.
पण तुम्हाला माहिती आहे काय इटलीमध्ये कोल्हापूरच्या छत्रपतींची समाधी आहे.
इटलीच्या फ्लोरेन्समधल्या कॅसीन पार्कमध्ये कोल्हापूरच्या राजाराम महाराजांचे स्मारक आहे.
पण या छत्रपतींची स्मारक फ्लॉरेन्समध्ये कशी काय हा प्रश्न पडला ना?
कोल्हापूरचे तिसरे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूच्या वेळी त्यांना कुणी वारस नव्हता.
म्हणून सरदार पाटणकर घराण्यातल्या नागोजीराव नावाच्या मुलाला 1866 साली दत्तक घेण्यात आले.
त्या मुलाचे नाव ठेवण्यात आले राजाराम महाराज.
राजाराम महाराज उच्च शिक्षणासाठी इंग्लंडच्या दौऱ्यावर गेले तेथे त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाला भेट दिली.
ऑस्ट्रियामध्ये असताना राजाराम महाराजांना संधीवातासारखा त्रास जाणवू लागला आणि त्यानंतर त्यांची तब्बेत अचानक खालावली.
इटलीच्या फ्लॉरेन्स येथे महाराजांनी अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर 2 वर्षांनी कोल्हापूरच्या राजघराण्याने हे स्मारक बांधले.