सकाळ डिजिटल टीम
पुणे-बंगलोर हायवेवरून कोल्हापूर शहरात प्रवेश करताना जी कमान लागते ती स्वागत कमान नव्याने बांधण्यासाठी पाडण्यात आलीय. २७ वर्षांपूर्वी बांधलेली कमान जीर्ण झाल्यानं धोकादायक बनली होती.
The Untold Story of Kolhapur’s Famous Tawde Hotel Once Icon Now Gone
Esakal
नव्याने बांधण्यात येण्याआधी जुनी कमान पाडत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर पुन्हा एकदा तावडे हॉटेल परिसर चर्चेत आलाय.
The Untold Story of Kolhapur’s Famous Tawde Hotel Once Icon Now Gone
Esakal
कोल्हापूर शहरात येताना किंवा बाहेर जाताना महामार्गालगत तावडे हॉटेल स्टॉप आहे. या ठिकाणी आता तावडे हॉटेल अस्तित्वात नसलं तरी नाव मात्र अजूनही आहे.
The Untold Story of Kolhapur’s Famous Tawde Hotel Once Icon Now Gone
Esakal
स्वातंत्र्यपूर्व काळात सोलापूरच्या कदम-तावडे कुटुंबातल्या शंकर आणि गिरजाबाई या दाम्पत्यानं कोल्हापुरात येऊन उचगावात घर घेतलं. त्यानंतर मुख्य चौकात विटांची भिंत उभारून पाल्याचं छप्पर बांधलं.
The Untold Story of Kolhapur’s Famous Tawde Hotel Once Icon Now Gone
Esakal
उचगावातल्या पाल्याचं छप्पर असलेल्या खोपटात राहत असताना पुणे बंगलोर जुन्या हायवेवर त्यांनी घराजवळच ट्रक थांबायचे. चहा-पाण्याची चौकशी व्हायची. त्यानंतर दाम्पत्यानं हॉ़टेल सुरू केलं.
The Untold Story of Kolhapur’s Famous Tawde Hotel Once Icon Now Gone
Esakal
हॉटेल चांगलं चालायचं आणि त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाहसुद्धा होत असे. या हॉटेलच्या जोरावरच त्यांचं कुटुंब जवळच्याच लोहार मळ्यात स्थायिक झालं. आता त्यांची तिसरी पिढी या भागात राहतेय.
The Untold Story of Kolhapur’s Famous Tawde Hotel Once Icon Now Gone
Esakal
हॉटेलमुळे कदम-तावडे कुटुंबाची वेगळी ओळख निर्माण झाली. हॉटेलचं मोठं बांधकाम करण्याची तयारी सुरू होती. पण २००३ मध्ये महामार्ग चौपदरीकरण झालं आणि यात हॉटेलच्या खोपटाचा शेवट झाला.
The Untold Story of Kolhapur’s Famous Tawde Hotel Once Icon Now Gone
Esakal
आज या चौकात इतर हॉटेल, चहाच्या टपऱ्या असल्या तरी या चौकात आल्यावर तावडे हॉटेलला आलोय असंच लोक सांगतात. हॉटेल अस्तित्वात नसलं तरी तावडे हॉटेल अशी ओळख मात्र कायम राहिलीय.
The Untold Story of Kolhapur’s Famous Tawde Hotel Once Icon Now Gone
Esakal
Esakal