हिवाळा स्पेशल... कोल्हापुरी स्टाइल बोकडाच्या मटणाचा झणझणीत पांढरा रस्सा!

Aarti Badade

कोल्हापुरी पांढऱ्या रस्स्याची खासियत

हिवाळ्यात गरमागरम आणि चविष्ट काहीतरी खायचे असेल, तर बोकडाच्या मटणापासून तयार केलेला कोल्हापुरी पांढरा रस्सा नक्की ट्राय करा.

Kolhapuri Mutton Pandhra Rassa

|

Sakal

पांढऱ्या रस्स्यासाठी साहित्य

हा रस्सा बनवण्यासाठी ५०० ग्रॅम बोकडाचे मटण, कांदा, आलं-लसूण पेस्ट, ओले खोबरे, काजू, पांढरे तीळ, खसखस आणि खडे मसाले लागतील.

Kolhapuri Mutton Pandhra Rassa

|

Sakal

सर्वप्रथम मटण शिजवून घ्या

कुकरमध्ये तूप गरम करून कांदा आणि आलं-लसूण पेस्ट परता, त्यात मटण व मीठ घालून गरम पाणी टाका आणि मटण मऊ होईपर्यंत शिजवून घ्या.

Kolhapuri Mutton Pandhra Rassa

|

Sakal

तयार करा खास पांढरे वाटण

भिजवलेले काजू, खसखस, भाजलेले पांढरे तीळ आणि ओले खोबरे थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये अगदी बारीक वाटून घ्या.

Kolhapuri Mutton Pandhra Rassa

|

Sakal

खड्या मसाल्यांची फोडणी द्या

पातेल्यात तूप गरम करून त्यात तमालपत्र, काळी मिरी, लवंग, वेलची आणि दालचिनी घालून मसाल्यांचा छान सुगंध येईपर्यंत परतून घ्या.

Kolhapuri Mutton Pandhra Rassa

|

Sakal

असा तयार करा पांढरा रस्सा

फोडणीमध्ये मटणाचा स्टॉक घालून उकळी आणा, त्यानंतर तयार पांढरे वाटण मिसळून मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे शिजवा.

Kolhapuri Mutton Pandhra Rassa

|

Sakal

गरमागरम पांढरा रस्सा सर्व्ह करा

तयार रस्स्यावर कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून गरमागरम सर्व्ह करा, हा कोल्हापुरी पांढरा रस्सा बाजरीच्या भाकरीसोबत किंवा तांबड्या रस्स्यासोबतही छान लागतो.

Kolhapuri Mutton Pandhra Rassa

|

Sakal

घारे डोळे असणाऱ्या लोकांचा स्वभाव कसा असतो? खरंच करतात का विश्वासघात?

Hazel eye

|

Sakal

येथे क्लिक करा