कोल्हापूरमधील 'या' गावात दिवाळी का साजरी केली जात नाही? शेकडो वर्षांची प्रथा

Yashwant Kshirsagar

देशभरात दिवाळी, कोलोलीत शांतता

संपूर्ण भारत दिवाळीच्या उत्साहात न्हातो असताना कोल्हापूर जिल्ह्यातील कोलोली गावात मात्र दिवाळी साजरी केली जात नाही. गावकरी शांतपणे आपली कामे करत असतात.

Kololi Dev Diwali

|

esakal

खरी दिवाळी

दिवाळीच्या अमावस्येनंतर तब्बल ३० दिवसांनी येणाऱ्या अमावस्येला येथे ‘देव दिवाळी’ साजरी केली जाते. त्या दिवशीच खरा उत्साह दिसतो.

Kololi Dev Diwali

|

esakal

पन्हाळ्यातील हे खास गाव

पन्हाळा तालुक्यातील कोलोली हे गाव कोल्हापूरपासून साधारण ३० किलोमीटर अंतरावर कासारी नदीच्या तीरावर वसलेले आहे.

Kololi Dev Diwali

|

esakal

दिवाळीच्या दिवशी सामान्य दिनक्रम

नवीन कपडे, आकाशकंदील, फराळ काहीही नसते. गावकरी नेहमीप्रमाणेच आपल्या कामात मग्न असतात, कारण त्यांची दिवाळी अजून येणार असते.

Kololi Dev Diwali

|

esakal

गाडाई देवी – ग्रामदेवता

गावाच्या मध्यभागी असलेल्या पुरातन मंदिरात गाडाई देवी विराजमान आहे. हे जागृत मंदिर असल्याने भाविकांची श्रद्धा अढळ आहे.

Kololi Dev Diwali

|

esakal

नवस फेडण्याची पद्धत

नवस फेडताना देवीसमोरील कासवाजवळ चामड्याची चप्पल ठेवली जाते. भक्त ती चप्पल गालावर व माथ्यावर मारून देवीला नमस्कार करतात.

Kololi Dev Diwali

|

esakal

देवीची यात्रा

गाडाई देवीची यात्रा म्हणूनच येथे देव दीपावली साजरी होते. त्या दिवशी गावाला यात्रेचे स्वरूप येते आणि पंचक्रोशीतील यात्रा सुरू होतात.

Kololi Dev Diwali

|

esakal

उत्साहाची खरी रंगत

गोडधोड फराळ, नवीन कपडे आणि घरांसमोर आकाशकंदील लावून गावकरी मोठ्या आनंदाने देव दिवाळी साजरी करतात.

Kololi Dev Diwali

|

esakal

आख्यायिका

नवीन लग्न झालेल्या मुलींना माहेरी दिवाळीसाठी नेले जाते, त्यामुळे सासरी दिवाळी साजरी होत नाही. गावाच्या परंपरेमुळेच ही प्रथा कायम आहे.

Kololi Dev Diwali

|

esakal

परंपरा जोपासणारे कोलोली

आधुनिक काळातही गावकरी पूर्वापार चालत आलेली ही वेगळी परंपरा उत्साहाने जपत आहेत. कोलोलीने आपले वेगळेपण टिकवून ठेवले आहे.

Kololi Dev Diwali

|

esakal

ताजमहालमध्ये एकही लाईट का नाही? ९९ टक्के लोकांना खरे कारण माहीतच नाही

Taj Mahal Night Lighting Ban

|

esakal

येथे क्लिक करा