Mahabaleshwar Khed Bridge : कोकण ते महाबळेश्वर थेट प्रवास; तब्बल 50 किमी अंतर कमी होणार, 'केबल स्टे ब्रिज'ची काय आहेत वैशिष्ट्ये?

बाळकृष्ण मधाळे

अभियांत्रिकीचा अद्‌भूत नमुना

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटन व उद्योग क्षेत्राचा कायापालट करणारा एक महत्त्वाकांक्षी आणि अभियांत्रिकीचा अद्‌भूत नमुना असणारा प्रकल्प पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

Konkan Cable Stayed Bridge project

|

esakal

'केबल स्टेड ब्रिज'चे काम पूर्ण

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्याला थेट साताऱ्यातील महाबळेश्वरशी जोडणाऱ्या, मुंबईच्या ‘वरळी सी-लिंक’च्या धर्तीवरील भव्य ‘केबल स्टेड ब्रिज’चे काम पूर्ण झाले असून, पावसाळ्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

Konkan Cable Stayed Bridge project

|

esakal

१७५ कोटी रुपये खर्च

१७५ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ५४० मीटर लांबीच्या या पुलामुळे महाबळेश्वर ते खेडदरम्यानचे अंतर तब्बल ५० किलोमीटरने कमी होणार आहे. या मार्गामुळे खेड तालुक्यातील रघुवीर घाटातील पर्यटनाला चालना मिळणार आहे.

Konkan Cable Stayed Bridge project

|

esakal

कोकण-साताऱ्यातील पर्यटनाला मिळणार चालना

मुंबईतील वरळी सी लिंकप्रमाणे असलेल्या कोकण व पश्चिम महाराष्ट्र जोडणाऱ्या केबल स्टेड ब्रिजचे काम पूर्ण झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कामाची पाहणी केली. या प्रकल्पामुळे कोकण व सातारा जिल्ह्यांतील पर्यटन उद्योगाला चालना मिळणार आहे.

Konkan Cable Stayed Bridge project

|

esakal

पर्यटकांसाठी व्ह्यू गॅलरी

पश्चिम महाराष्ट्रात अशा स्वरूपाचा पहिलाच केबल स्टे ब्रिज उभारला जात आहे. ५४० मीटर लांबी व १४ मीटर रुंदीचा हा पूल आहे. याच पुलाच्या मध्यवर्ती ४३ मीटर उंचीची पर्यटकांसाठी व्ह्यू गॅलरी आहे. या गॅलरीत जाण्यासाठी कॅप्सूल लिफ्ट असणार आहेत.

Konkan Cable Stayed Bridge project

|

esakal

सनराइज्-सनसेटचे दर्शन होणार

तसेच दोन्ही बाजूंनी जिन्याचे मार्गही असणार आहे. या प्रकल्पाचे काम टी अँड टी कंपनी करत आहे. गेल्या तीन वर्षांत हा पूल उभारण्यात आला आहे. व्ह्यू गॅलरीमुळे सह्याद्रीतील कोयनाचे बॅक वॉटर व अत्यंत विलोभनीय दृश्य असलेल्या सनराइज् व सनसेटचेही दर्शन होणार आहे.

Konkan Cable Stayed Bridge project

|

esakal

कोकणात जाण्यासाठी पर्यायी मार्ग

रत्नागिरी जिल्ह्यातून महाबळेश्वरला जाण्यासाठी पोलादपूरचा अवघड आंबेनळी घाट मार्गाचा फेरा वाचणार आहे. खेड तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या रघुवीर घाटमार्गे या नव्या ब्रिजवरून पलीकडे तापोळामार्गे महाबळेश्वर व थेट तापोळा कासमार्गे सातारा जाता येणार आहे. त्यामुळे जवळपास ५० किलोमीटरचे अंतर कमी होणार आहे.

Konkan Cable Stayed Bridge project

|

esakal

Monsoon Tourism India : पावसाळ्यानंतर भारताची 'ही' 8 ठिकाणं बनतात थेट स्वर्ग; निसर्गाची जादू पाहायची असेल तर आत्ताच प्लॅन करा!

Monsoon Tourism India

|

esakal

येथे क्लिक करा...