कोकणात सापडली 'मानवाची सावली', हजारो हजारो वर्षांपूर्वीचं रहस्य उलगडलं!

Sandip Kapde

शोध –

कोकणातील पन्हाळेतर्फे सौंदळ येथील माळवाडी परिसरात प्राचीन मानवाकृती कातळशिल्पाचा शोध सहा मित्रांनी लावला.

Ancient Mystery Unearthed

|

esakal

वैशिष्ट्य –

जांभ्या दगडावर कोरलेले हे कातळशिल्प सुमारे चार फूट उंच आणि तीन फूट रुंद असून त्याची रचना अत्यंत वेगळी आहे.

Ancient Mystery Unearthed

|

esakal

आकार –

दगडात सुमारे एक इंच खोलीपर्यंत कोरलेली ही मानवाकृती दोन्ही हात बाजूला पसरलेल्या अवस्थेत दिसते.

Ancient Mystery Unearthed

|

esakal

भास –

दूरून पाहिल्यास एखाद्या व्यक्तीची सावलीच कातळावर उमटल्याचा भास होतो, हे या शिल्पाचे विशेष आकर्षण आहे.e

Ancient Mystery Unearthed

|

esakal

मोहिम –

निसर्गभ्रमंतीदरम्यान विनोद पवार, पराग पारकर, वरद पवार, वरुण जाधव, यश इंगळे आणि समर्थ आबवले यांना हे शिल्प आढळले.

Ancient Mystery Unearthed

|

esakal

वारसा –

हे कातळशिल्प कोकणातील प्राचीन सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचा महत्त्वाचा भाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Ancient Mystery Unearthed

|

esakal

पुरावा –

कोकणात हजारो वर्षांपूर्वी मानवाचे वास्तव्य होते, याला बळकटी देणाऱ्या कातळशिल्पांपैकी हे आणखी एक महत्त्वाचे उदाहरण मानले जात आहे.

Ancient Mystery Unearthed

|

esakal

दस्ताऐवज –

शोध लागताच परिसराची पाहणी, स्वच्छता आणि प्राथमिक दस्ताऐवजीकरणाचे काम तातडीने सुरू करण्यात आले.

Ancient Mystery Unearthed

|

esakal

अभ्यास –

या मानवाकृती कातळशिल्पाचा पुरातत्त्व विभागाने सखोल अभ्यास करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

Ancient Mystery Unearthed

|

esakal

संवर्धन –

ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी या कातळशिल्पाचे संरक्षण आणि संवर्धन तातडीने व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Ancient Mystery Unearthed

|

esakal

महत्त्व –

नव्याने सापडलेल्या या कातळशिल्पामुळे कोकणाच्या प्राचीन इतिहासावर आणि मानवाच्या सुरुवातीच्या वास्तव्यावर नव्याने प्रकाश पडण्याची शक्यता आहे.

Ancient Mystery Unearthed

|

esakal

महाराष्ट्राबाहेरचं शिवरायांचं हे घर पाहिलंत का? आजही उभा आहे इतिहासाचा साक्षीदार!

Chhatrapati Shivaji Maharaj House

|

esakal

येथे क्लिक करा