पावसाळ्यात निसर्गाचं अद्भुत सौंदर्य अनुभवायचंय? कोकणातील 'ही' ७ ठिकाणे आजिबात चुकवू नका

Yashwant Kshirsagar

पावसाळ्यात नंदनवन

पावसाळ्यात कोकणचे हिरवेगार डोंगर, खळखळते धबधबे आणि शांत समुद्रकिनारे पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव देतात.

Konkan Monsoon Travel

|

esakal

बाबा धबधबा

महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील हा धबधबा हिरव्यागार डोंगरांमध्ये आहे. खळखळत्या पाण्याचा आवाज आणि घनदाट जंगल मनाला शांती देते. फोटोग्राफी आणि स्थानिक खाद्यपदार्थांसाठी हे उत्तम ठिकाण आहे.

Konkan Monsoon Travel

|

esakal

आंबोली घाट

पावसाळ्यात धुक्याने झाकलेला आंबोली घाट, मुख्य धबधबा, सूर्यास्त फोटोग्राफीप्रेमींसाठी स्वर्ग आहे. सावंतवाडी किंवा गोव्याहून सहज पोहोचता येते.

Konkan Monsoon Travel

|

esakal

देवकुंड धबधबा

रायगड जिल्ह्यातील भिरा गावाजवळील हा खोल खोऱ्यात कोसळणारा धबधबा हिरव्या जंगलाने वेढलेला आहे. मुंबई-पुण्याहून जवळ आहे. हलका ट्रेक करून पोहोचा आणि साहसाचा आनंद घ्या.

Konkan Monsoon Travel

|

esakal

गणपतीपुळे

गणपती मंदिराच्या दर्शनासोबत स्वच्छ समुद्रकिनाऱ्यावर फिरता येते. पावसाळ्यात नारळी झाडे आणि लाटांचा आवाज मनाला एक वेगळाच आनंद देतो. येथे कोकणी पदार्थांवरही ताव मारता येतो.

Konkan Monsoon Travel

|

esakal

मुरुड-जंजिरा

पावसाळ्यात बोटीतून समुद्रातून जाण्याचा रोमांच अनुभवा. पांढऱ्या वाळूचे किनारे आणि ऐतिहासिक किल्ला पाहा. अलिबागहून जवळ असलेला हा किल्ला पावसाळ्यातील एक दिवसीय सहलीसाठी परफेक्ट आहे.

Konkan Monsoon Travel

|

esakal

तारकर्ली

स्वच्छ निळ्या पाण्याचा किनारा आणि कमी गर्दी. पावसाळ्यात स्कूबा डायव्हिंग किंवा स्नॉर्कलिंगसाठी हवामान बंद असते पण किनाऱ्यावर पाऊस अनुभवू शकता.

Konkan Monsoon Travel

|

esakal

भाट्ये समुद्रकिनारा

पांढरी वाळू, सुरूची घनदाट झाडे आणि पावसाळ्यातील धुके फोटोग्राफीसाठी स्वर्ग आहेत. जवळील झरी विनायक मंदिराला भेट देऊन आध्यात्मिक अनुभव घेऊ शकता

Konkan Monsoon Travel

|

esakal

अविस्मरणीय आठवण

धबधबे, समुद्रकिनारे, घाट आणि निसर्ग यांचा मिलाफ कोकणातच शक्य आहे. पावसाळ्यातील कोकणचे सौंदर्य अनुभवण्यासाठी ट्रिपचे प्लॅन करा आणि एक नवा अविस्मरणीय अनुभव घ्या.

Konkan Monsoon Travel

|

esakal

'या' देशातील लोक स्टॅमिना वाढविण्यासाठी पितात विषारी सापांचे रक्त, हजारो वर्षांची पंरपरा

Snake Blood Benefits

|

esakal

येथे क्लिक करा