कोकणातील 'या' गावात आहे साईबाबांचे जगातील पहिले मंदिर, तुम्ही पाहिलंत का?

Yashwant Kshirsagar

शिर्डी

जगभरात प्रसिद्ध असलेले संत साईबाबा यांनी अहिल्यानगर ( पूर्वीचे अहमदनगर) जिल्ह्यातील महासमाधी घेतली. शिर्डीत मोठे साईमंदिर देखील आहे, लाखो भक्तांची येथे दर्शनासाठी गर्दी होते.

Sai Baba first temple

|

esakal

पहिले मंदिर

मात्र साई बाबाचे पहिले मंदिर शिर्डीतील नाही तर कोकणातील एका छोट्या गावात असल्याचा दावा केला जात आहे.

Sai Baba first temple

|

esakal

ऐतिहासिक ओळख

महासमाधीनंतरचे पहिले मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ (कविलगाव) येथील हे मंदिर १९१८ मध्ये साईबाबांनी महासमाधी घेतल्यानंतर जगात बांधलेले 'पहिले' साईबाबा मंदिर म्हणून ओळखले जाते.

Sai Baba first temple

|

esakal

दिव्य दृष्टांत

दत्त भक्ती ते साई भक्ती मंदिराचे संस्थापक रामचंद्र माड्ये हे दत्ताचे परम भक्त होते. त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला की भगवान दत्त शिर्डीमध्ये साईंच्या रूपात अवतरले आहेत, त्यानंतर ते शिर्डीला गेले.

Sai Baba first temple

|

esakal

बाबांचा अमूल्य आशीर्वाद

शिर्डीत पहिल्या दर्शनावेळी साईबाबांनी प्रसादाचे एक रुपयाचे नाणे रामचंद्र माड्ये यांना एक रुपयाचे नाणे दिले. माड्येबुवांनी हे नाणे आयुष्यभर एक अमूल्य ठेवा म्हणून जपून ठेवले.

Sai Baba first temple

|

esakal

पहिला पुण्यतिथी उत्सव

साईबाबांच्या महासमाधीनंतर, १९१९ मध्ये शिर्डीबाहेर पहिली सार्वजनिक पुण्यतिथी कुडाळमध्ये साजरी झाली. यासाठी बाबांनी दिलेल्या त्याच एका रुपयाच्या नाण्याचा वापर करण्यात आला.

Sai Baba first temple

|

esakal

मंदिराची स्थापना

साई बाबांच्या चौथ्या पुण्यतिथीचे औचित्य साधून १९२२ मध्ये माड्येबुवांनी कुडाळमध्ये भव्य मंदिर उभारले आणि साईबाबांच्या भक्तीचा जागर सुरू केला.

Sai Baba first temple

|

esakal

शिर्डीच्या आधी मूर्ती स्थापना

ऐतिहासिक संदर्भानुसार शिर्डीच्या समाधी मंदिरात १९५४ मध्ये मूर्ती बसवण्यात आली, मात्र कुडाळच्या मंदिरात त्याआधी ३२ वर्षे म्हणजेच १९२२ मध्येच ६ फुटांची भव्य मूर्ती स्थापित करण्यात आली होती.

Sai Baba first temple

|

esakal

शिल्पकारांचे कौशल्य

सुरुवातीची ६ फुटांची मूर्ती श्री बाबूराव सारंग यांनी घडवली होती. पुढे १९८३ मध्ये नूतनीकरण करताना त्यांचे पुत्र श्री श्याम सारंग यांनी ७.५ फुटांची नवीन आकर्षक मूर्ती साकारली.

Sai Baba first temple

|

esakal

निसर्गरम्य, शांत परिसर

कविलगावच्या साई नगरमध्ये वसलेले हे मंदिर आणि तिथला परिसर भक्तांना आपोआपच मनःशांती आणि समाधान देतो. भक्तांच्या मते, येथे बाबांच्या अस्तित्वाची प्रचिती येते.

Sai Baba first temple

|

esakal

माड्ये परिवाराची अखंड सेवा

तिसरी पिढी कार्यरत असून १९२२ पासून आजपर्यंत माड्ये परिवार या मंदिराची देखभाल करत आहे. रामचंद्र माड्ये, त्यानंतर श्रीपाद माड्ये आणि आता राजन माड्ये ही परंपरा समर्थपणे पुढे चालवत आहेत.

Sai Baba first temple

|

esakal

हनिमूनसाठी गोवा अन् काश्मीर कशाला? कोकणात 'या' ५ ठिकाणी कमी बजेटमध्ये अनुभवा स्वर्गसुख

Budget Honeymoon Places in Konkan

|

esakal

येथे क्लिक करा