बाळकृष्ण मधाळे
कोकण म्हटलं की डोळ्यांसमोर येतात स्वच्छ निळाशार समुद्र, पांढरी वाळू, हिरवीगार डोंगररांग आणि ऐतिहासिक किल्ले. निसर्गाच्या कुशीत वसलेला कोकण पर्यटनप्रेमींसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिला आहे.
Best Tourist Places to Visit in Konkan
esakal
शांत वातावरण, सुंदर समुद्रकिनारे आणि ऐतिहासिक वारसा यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक ठिकाणे पर्यटकांना खास अनुभव देतात. कोकणात फिरायला गेल्यावर नक्की भेट द्यावी अशी ही सात सुंदर ठिकाणे पाहूया.
Best Tourist Places to Visit in Konkan
esakal
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे कोकणातील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळांपैकी एक आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला भव्य सिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरतो. तसेच किल्ल्यातील महाराजांचा पुतळा आणि समुद्राच्या सान्निध्यातील निसर्ग पर्यटकांना विशेष आकर्षित करतो.
Best Tourist Places to Visit in Konkan
esakal
स्वच्छ आणि विस्तीर्ण समुद्रकिनारे, निसर्गरम्य बंदर आणि शांत वातावरणामुळे वेंगुर्ला पर्यटकांच्या पसंतीस उतरते. गर्दीपासून दूर निवांत वेळ घालवण्यासाठी हे ठिकाण उत्तम मानले जाते.
Best Tourist Places to Visit in Konkan
esakal
ऐतिहासिक वारसा आणि संस्कृती जपणारे सावंतवाडी हे शहर पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. येथे असलेला सुंदर मोती तलाव आणि सभोवतालचे हिरवेगार डोंगर परिसराला विशेष मोहक बनवतात.
Best Tourist Places to Visit in Konkan
esakal
स्वच्छ पाणी आणि सुरक्षित किनारा यामुळे शिरोडा बीच पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. येथे समुद्रस्नानाचा आनंद सुरक्षितपणे घेता येतो.
Best Tourist Places to Visit in Konkan
esakal
निसर्गरम्य आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध असलेला नीवती बीच पर्यटकांना मंत्रमुग्ध करतो. नितळ निळे पाणी आणि सुंदर किनारा फोटोग्राफीसाठी अत्यंत योग्य मानला जातो.
Best Tourist Places to Visit in Konkan
esakal
पांढऱ्या शुभ्र वाळूचा किनारा आणि स्वच्छ समुद्र यासाठी तारकर्ली जगभरात ओळखले जाते. येथे स्कुबा डायव्हिंग आणि विविध वॉटर स्पोर्ट्सचा रोमांचक अनुभव घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात.
Best Tourist Places to Visit in Konkan
esakal
महाराष्ट्र-गोवा सीमेवर वसलेले रेडी हे गाव धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे आहे. येथे असलेले प्रसिद्ध रेडी गणपती मंदिर भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानले जाते.
Best Tourist Places to Visit in Konkan
esakal
निसर्ग, इतिहास आणि समुद्र यांचा अद्भुत संगम अनुभवायचा असेल, तर कोकणातील ही ठिकाणे नक्कीच एकदा तरी भेट द्यावी अशीच आहेत. येथे मिळणारी शांतता आणि निसर्गसौंदर्य पर्यटकांना खऱ्या अर्थाने स्वर्गाचा अनुभव देते.
Best Tourist Places to Visit in Konkan
esakal
Nandi Hills Karnataka
esakal